सांग कधी कळणार तुला ...विडंबन
Submitted by ओबामा on 7 March, 2024 - 08:28
शब्दांविना माझ्या भावना कळतील का रे तुला
स्पर्शातुनी माझ्या वेदना जाणवतील का रे तुला
घायाळ या काळजाचे ठोके ऐकू येतील का रे तुला
डोळ्यांतील अश्रुंचे अर्थ समजून येतील का रे तुला
मी न माझी राहिले विसरून गेले स्वतःला
होऊनि नदी सागराची मज अर्पियेले तुला
स्वीकारुनी माझे प्रेम हे हृदयी ठेवशील का मला
देशील का जन्मोजमी साथ तू सख्या मला.....
- प्राजक्ता