प्रखर उजेड देणारा दिवा
समजा, दोन काचेचे कंदिल आहेत. त्यातल्या एकाची काच काजळीने पूर्ण माखली आहे. (एकही प्रकाशकण बाहेर येऊ शकणार नाही असा) अगदी जाड थर. नंतर समोरून दिसेल असा एक लहान गोल आतून कोरून त्या गोलातली काजळी काळजीपूर्वक स्वच्छ केली आहे.
दुसर्या कंदिलाच्या काचेला याचप्रकारे (एक लहानसा गोल वगळता) पण चकचकीत मुलामा दिला आहे. आता दोन्ही कंदिल (सारख्याच एककाचा प्रकाश देणार्या वातीने) प्रज्ज्वलीत केले. दोन्हींपैकी कोणत्या कंदिलाच्या गोलातून बाहेर पडणारा प्रकाश जास्त प्रखर असेल? का?