Submitted by गजानन on 13 April, 2013 - 14:40
समजा, दोन काचेचे कंदिल आहेत. त्यातल्या एकाची काच काजळीने पूर्ण माखली आहे. (एकही प्रकाशकण बाहेर येऊ शकणार नाही असा) अगदी जाड थर. नंतर समोरून दिसेल असा एक लहान गोल आतून कोरून त्या गोलातली काजळी काळजीपूर्वक स्वच्छ केली आहे.
दुसर्या कंदिलाच्या काचेला याचप्रकारे (एक लहानसा गोल वगळता) पण चकचकीत मुलामा दिला आहे. आता दोन्ही कंदिल (सारख्याच एककाचा प्रकाश देणार्या वातीने) प्रज्ज्वलीत केले. दोन्हींपैकी कोणत्या कंदिलाच्या गोलातून बाहेर पडणारा प्रकाश जास्त प्रखर असेल? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुस-या प्रकारचा. चकचकीत
दुस-या प्रकारचा. चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे सगळीकडून एकत्रित होणारा प्रकाश त्या छोट्या वर्तुळातून प्रखर भासेल. याउलट काळा रंग हा प्रकाश शोषून घेणारा असल्याने तिथे ब-यापैकी उर्जा साठवली जाईल किंवा उष्णतेत रूपांतरीत होईल. परावर्तित होणार नाही. परावर्तन होऊन येणारा प्रकाश दुस-या कंदिलापेक्षा कमी असल्याने काळा कंदील हा कमी प्रकाश देणारा वाटेल.
आधी ट्युबलाईट बंद करा...
आधी ट्युबलाईट बंद करा...
आधी आंघोळ करा. मग वास न येता
आधी आंघोळ करा. मग वास न येता झोप येइल.
काळा कंदील हा कमी प्रकाश
काळा कंदील हा कमी प्रकाश देणारा वाटेल. <<< मलाही असेच वाटते. पण कार्व्हरवरचं पुस्तक वाचत होतो (एक होता कार्व्हर). त्यात जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर हा वैज्ञानिक कापसाच्या बेसुमार लागवडीनं निकस होऊन उजाड झालेल्या दक्षिण अमेरिकेतल्या जमिनी आपल्या ज्ञानाचा आणि संशोधनाचा उपयोग करून वाचवण्यासाठी आणि आपल्या निग्रो बांधवांचा विकास करण्यासाठी आयोवातली उच्च पदावरची नोकरी सोडून टस्कगीत येतो. तिथे अर्थात संशोधनासाठी लागणार्या साधनसामुग्रीची वाणवा होती. म्हणून तो आजुबाजूच्या वस्तीतून जमेल तेवढ्या भंगार वस्तू गोळा करून त्यातूनच आपली प्रयोगशाळा उभारतो. मायक्रोस्कोपवर (जो त्याला आयोवातल्या निरोपाच्या वेळी भेट म्हणून मिळालेला असतो.) त्यातल्या त्यात प्रखर उजेड पाडण्यासाठी त्याने काजळीने माखलेला दिवा तयार केला. काजळीमुळे प्रखर उजेड कसा काय मिळत असावा, हे कळले नाही.
तुम्ही तुलना केल्याने चूक
तुम्ही तुलना केल्याने चूक झाली. कार्व्हरने उपलब्ध साहीत्यातून दिवा बनवला. त्याला पारा मिळाला असता तर त्याने तोच पर्याय आधी वापरला असता. दुसरा पर्याय म्हणजे प्रकाश बाहेर जाऊ न देणे. ब्लॅक बॉडीचे गुणधर्म आता लक्षात नाहीत. पण काजळीने प्रकाश बाहेर न गेल्याने त्याला वाट मिळाली तेव्हां एकत्रित प्रकाश वजा शोषून घेतला गेलेला प्रकाश मिळाला. पा-याचा वापर केला असता तर ती बेरीज झाली असती. हल्ली छताला लावण्याचे ट्युबलाईटसचे फिटींग्ज येतात, ज्यात आरशाचा वापर केलेला असतो.
किरण, हो तुलना चुकली. पण
किरण, हो तुलना चुकली. पण काजळीच का? काजळी जास्त प्रकाश शोषून घेणार ना (तुम्ही म्हणताय तसा वजा होऊन नेहमीपेक्षाही कमी प्रकाश मिळेल ना?). असो, माझे चुकतही असेल.
इथे एमिसिव्हिटी
इथे एमिसिव्हिटी महत्वाची:
https://en.wikipedia.org/wiki/Emissivity
गजानन, >> काजळीमुळे प्रखर
गजानन,
>> काजळीमुळे प्रखर उजेड कसा काय मिळत असावा, हे कळले नाही.
काजळीमुळे सापेक्ष काळोखी (काँट्रास्ट) वाढते. पण प्रखरता तेव्हढीच राहते.
आ.न.,
-गा.पै.
आशिष, गामा पैलवान,
आशिष, गामा पैलवान, लिंकांबद्दल धन्यवाद.
वाचून (समजतेय का) बघतो.