क्लूलेस - ९
आज रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार ९ वाजता क्लूलेस ९ची लिंक अॅक्टिव्हेट होईल. ती इथे पेस्ट करते.
झालं सुरू!!!! http://klueless.in/klueless/klueless9/default.asp
नियम, पथ्यं नेहमीचीचः
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.
२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.