Submitted by गजानन on 26 February, 2012 - 07:57
दोन नळांच्या साहाय्याने एक टाकी भरायला सहा तास लागतात. एका वेळी एकच नळ चालू ठेवला तर टाकी भरायला लहान नळाला मोठ्या नळापेक्षा पाच तास जास्त लागतात.
प्रत्येक नळाला स्वतंत्रपणे टाकी भरायला किती तास लागतील?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोठा नळ १ तास लहान नळ ५
मोठा नळ १ तास
लहान नळ ५ तास
.................................................................................................
टाकी भरायची आहे कशाला पण
अंदाजे मोठ्या नळाला सात तास
अंदाजे
मोठ्या नळाला सात तास आणि लहान नळाला १२ तास
उदय, चूक. तुमचे उत्तर बरोबर
उदय, चूक.
तुमचे उत्तर बरोबर धरले तर दोन्ही नळांना मिळून (एकाच वेळी दोन्ही नळ चालू ठेवले तर) टाकी भरायला पाच तासांपेक्षा कमी वेळ लागायला हवा. प्रत्यक्षात दोन्ही नळांना मिळून सहा तास लागतायत.
.
टाकी भरायची आहे कशाला पण <<< उत्तर काढायला.
युरी गागारीन, सिद्ध करा..
-----------------------------------------------------
अवांतर : युरी गागारीन हा महान माणूस होता. आपल्या ध्येयाचा देहभान हरपून पाठपुरावा करणार्या थोर व्यक्तींपैकी एक. या निमित्ताने (तुमच्या या आयडीवरून) त्याची आठवण झाली.
गजानन भाऊ मी लहान माणूस आहे.
गजानन भाऊ मी लहान माणूस आहे. मोठ्या लोकांचे नाव वापरतो. तुम्हाला ज्ञानतपस्वी माहीत आहेत का ? नसतील माहिती तर माबोची पहिली चार पानं चाळा आणि
माझं उत्तर चुकीचं कसं हे सिद्ध करा
अरे दोन्ही चालू ठेवा
अरे दोन्ही चालू ठेवा तुम्ही.....आणि पाणी जाण्या अगोदर टाकी भरा..... नंतर वांदे होतील....
ओ. के.
ओ. के.
अ = मोठा नळ, ब = लहान नळ अ +
अ = मोठा नळ, ब = लहान नळ
अ + ब मिळून ६ तासात टाकी भरतात. म्हणून अ+ब मिळून एका तासात १/६ टाकी भरतात.
समजा, अ ला एकट्याला टाकी भरायला क्ष तास लागतात. म्हणून ब ला एकट्याला टाकी बरायला क्ष+५ तास लागतील.
म्हणजेच एका तासात अ एकटा १/क्ष टाकी भरेल आणि ब एकटा १/(क्ष+५) टाकी भरेल.
पण, (१/क्ष) + (१/[क्ष+५]) = १/६
म्हणजेच, क्ष+५+क्ष / क्षवर्ग+५ = १/६
--> ६(२क्ष + ५) = क्षवर्ग + ५क्ष
--> १२क्ष + ३० = क्षवर्ग + ५क्ष
--> क्षवर्ग - ७क्ष - ३० = ०
--> (क्ष - १२) (क्ष +५) = ०
हे वर्गसमीकरण सोडवल्यास, क्ष च्या दोन किंमती मिळतात
--> क्ष = १२ , क्ष = -५
म्हणून उत्तर क्ष = १२.
मोठा नळ एकटा १२ तासात आणि लहान नळ एकटा १७ तासात टाकी भरतील.
ता.क. खूपच वर्षांनी काळ, काम, वेगाचं गणित सोडवलंय. बरोबर आहे की नाही माहित नाही. पण मजा आली.
मामी, सुरुवात जबरी होती. (पण
मामी, सुरुवात जबरी होती.
(पण बारा पंचे साठ होतात, तीस नाही. )
क्षवर्ग - ७क्ष - ३० = ० <<<
इथून पुढे (क्ष - १०) (क्ष + ३) = ० असे हवे ना?
मग मोठ्या नळाला १० तास आणि लहान नळाला १५ तास लागतील.
अरे हो की, बरोबर. तिथे फोड
अरे हो की, बरोबर. तिथे फोड करण्यात घोळ झाला ना? हे हे हे. धन्यवाद गजानन.
मामी तुस्सी ग्रेट हो..
मामी
तुस्सी ग्रेट हो..
गजानन , भयंकरच गडबडीत आहे.
गजानन , भयंकरच गडबडीत आहे. पण असला प्रश्न आल्यावर सोडवल्याशिवाय राहवत नायं.
1/t +1/(t-5)=1/6
After solving
t^2 -17t+30=0
(t-15)(t-2)=0
t=2 t=15
छोट्या नळाला १५ तास आणि मोठ्या नळाला १० तास लागतील.
उत्तर बरोबर आहे का?
(No subject)
अरे काय हे? दुसरा कामधन्धा
अरे काय हे? दुसरा कामधन्धा नाहि काय?
लहान नळाने पाणी भरायला क्ष
लहान नळाने पाणी भरायला क्ष तास, तर मोठ्या नळाने पाणी भरायला (क्ष-५) तास लागतात.
एका तासात लहान नळाने १/क्ष, मोठ्या नळाने १/(क्ष-५) तर दोन्ही नळांनी १/६ टाकी भरली जाईल.
म्हणून १/क्ष+१(क्ष-५)=१/६
दोन्ही बाजूंना ६क्ष(क्ष-५) ने गुणून
६(क्ष-५)+६क्ष=क्ष(क्ष-५)
१२क्ष-३०= ६ क्षवर्ग-५क्ष
०= क्षवर्ग -१७क्ष+३०
क्षवर्ग -१५क्ष -२क्ष +३० =०
क्ष (क्ष-१५) -२ (क्ष-१५)=०
(क्ष-२) (क्ष-१५)=०
क्ष=२ किंवा क्ष=१५
क्ष=२ धरले तर दुसर्या नळाने पाणी भरायला उणे ३ तास लागतील. त्यामुळे हे उत्तर बाद.
म्हणून क्ष=१५.
लहान नळाने पाणी भरायला १५ तर मोठ्या नळाने पाणी भरायला १० तास लागतील.
ताळा : १५-१०=५
एका तासात दोन्ही नळांनी १/१५+१/१०=२/३०+३/३०=५/३० =१/६ टाकी भरेल.
सीमा, भरत, हो. मोठ्या नळाला
सीमा, भरत, हो. मोठ्या नळाला १० तास आणि लहान नळाला १५ तास लागतील.
माझे उत्तर मोठा नळ १०
माझे उत्तर मोठा नळ १० तास्.लहान नळ १५ तास.
मोठा नळ क्ष तासात टाकी भरत असेल तर लहान नळ क्ष+५ तासात्..दोघांचे १ तासाचे काम अनुक्रमे१/क्ष आणि १/क्ष्+५.आता दोन्ही टाक्या ६ तासात दोन्ही नळाने भरतात म्हणजे ६ तासाचे दोन्ही नळाचे काम -
६[१/क्ष]+ ६[१/क्ष+५]= १ [काम पुर्ण होते]
हे समीकरण सोडवताना-
६[क्ष+५]+६[क्ष्]=१[क्ष्][क्ष+५]
६क्ष्+३०+६क्ष=क्ष वर्ग्+५क्ष
१२क्ष्+३०=क्ष वर्ग+५ क्ष
क्ष वर्ग+ ५ क्ष-१२ क्ष - ३०=०
क्ष वर्ग -७ क्ष - ३० =०
क्ष वर्ग -१०क्ष +३ क्ष -३० =०
[क्ष - १०] [क्ष + ३] =०
क्ष-१०=० म्हणुन क्ष=१० आणि क्ष+३=० तर क्ष = -३ जे शक्य नाही.
आता मोठा नळ क्ष तर लहान नळ क्ष+५ .म्हणुन मोठा नळ १० तासात तर लहान नळ क्ष+५ म्हणजे १०+५=१५ तासात टाकी भरेल.
कुठल्या गावात आहे ही टाकी. १०
कुठल्या गावात आहे ही टाकी. १० आणि १५ तास पाणी येतय.
गजाभाउ तुमच हे आस हाय
गजाभाउ तुमच हे आस हाय बगा.
कारभारनीन पानी भराया सांगितल तर कुठल्या नळान भरु??
अवो तांबड फुटु द्या की मग ते कुनाच्याबी कोंबड्यान आरवुन फुटल म्हुन काय झाल.
गजानना विचार करायला लावणार कोड आहे खरं.
माझी पहिली पद्धत चुकली. म्हणुन अजुन विचार करत होतो तोवर कुणाच तरी बरोबर असलेल उत्तर दिसलचं.
मन वढाय वढाय. दुसर काय.
नंदिनी काळ-काम-वेगाच्या
नंदिनी काळ-काम-वेगाच्या गणितात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नसतात तरीही गणित मात्र सोडवावे लागते..विरुद्ध दिशेने /एका दिशेने धावणार्या आगगाड्या/मोटारी ,असे सतत वहाणारे नळ आणि त्यावरचे प्रश्न यात वेळ घालवणारे विद्यार्थी..एक मज्जाच होती ती.
तुम्च्यकदे तर लै भरि असते कि
तुम्च्यकदे तर लै भरि असते कि राव...................................