सुटका
दुपारची शांतता एखाद्या गुहेसारखी
खिडकीबाहेर झुलणाऱ्या गव्हाच्या लोम्ब्या,
तू तेथे बसली आहेस शांत जुन्या कोपऱ्यात,
माझे मन भरकटत शेतात,
घराच्या सर्व खोल्या पार करीत
गुहेचा थंड गार काळोख ओंलांडत
सभोवतीचे सूर्यप्रकाशाचे तुकडे उचलून हातात
मी धावत सुटतो मोकळ्या माळरानात, उजाड तेकड्याभोवती
निळे आकाश खेचत जाते मला
वारा ढकलत जातो मला
तुझ्यापासून दूर... दूर...
पण प्राचीन आठवणीतून बाहेर येत
जेव्हा तू साद घालतेस खिडकीतून
हास्य माझ्या प्रेमाचे
तिच्या त्या चाहुलिने मी पघळायचो असा
जशी त्या चहात साखर पघळते
तिच्या त्या विचारात मी मग्न व्हायचो असा
जसा तो भ्राम्हन पोथित होतो मग्न
प्रयत्न मी फार केले जवळ तिच्या जाण्याचे
तिच्याशी बोलण्याचे तिच्यात रमण्याचे
तिच्यासमोर जाण्याची भिती अशी वाटायची
हसुनी माझे दात पीवळे तिला दिसण्याची
जेम तेम जसे तसे गाठले मी प्रेम गडाला
शेवटी मग मी गेलो प्रपोज तिजला करायला
तिनेही मला तेव्हा साथ द्यायच ठरवल
दुसर्या दिवशी लगेच मला भैया म्हणुन रोखल
अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची
सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..
अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..