प्रेम - आणि - ती

आम्ही प्रेमात पडलो नाही

Submitted by बीज on 4 January, 2012 - 01:18

लाख झाल्या हीर तरी,
रांझा सारखे काही घडलो नाही,
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही

नजरेच्या लपंडावात ती नेहमी फसायची,
चोरट्या कटाक्षांना तिही शोधात असायची,
"अहो भाग्याने!!" माझ्याच बस stop वर बसायची,
मीच बघायचो लाजून त्यावेळी मात्र गोड हसायची...
"येतोस ???" म्हणाली एकदा ,
पण बिलाच्या भीतीने रिक्षात काही चढलो नाही,
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही

त्या दिवशी तिच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता त्रास,
मधूनच हुंद्क्यातून फुटत होता उच्छवास ,
मलूल तिच्या डोळ्यांनी धरली होती अश्रूंची कास,

गुलमोहर: 

हास्य माझ्या प्रेमाचे

Submitted by सोनालि खैर्नार on 21 April, 2011 - 03:11

हास्य माझ्या प्रेमाचे

तिच्या त्या चाहुलिने मी पघळायचो असा
जशी त्या चहात साखर पघळते

तिच्या त्या विचारात मी मग्न व्हायचो असा
जसा तो भ्राम्हन पोथित होतो मग्न

प्रयत्न मी फार केले जवळ तिच्या जाण्याचे
तिच्याशी बोलण्याचे तिच्यात रमण्याचे

तिच्यासमोर जाण्याची भिती अशी वाटायची
हसुनी माझे दात पीवळे तिला दिसण्याची

जेम तेम जसे तसे गाठले मी प्रेम गडाला
शेवटी मग मी गेलो प्रपोज तिजला करायला

तिनेही मला तेव्हा साथ द्यायच ठरवल
दुसर्या दिवशी लगेच मला भैया म्हणुन रोखल

अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची

गुलमोहर: 
Subscribe to RSS - प्रेम - आणि - ती