लाख झाल्या हीर तरी,
रांझा सारखे काही घडलो नाही,
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
नजरेच्या लपंडावात ती नेहमी फसायची,
चोरट्या कटाक्षांना तिही शोधात असायची,
"अहो भाग्याने!!" माझ्याच बस stop वर बसायची,
मीच बघायचो लाजून त्यावेळी मात्र गोड हसायची...
"येतोस ???" म्हणाली एकदा ,
पण बिलाच्या भीतीने रिक्षात काही चढलो नाही,
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
त्या दिवशी तिच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता त्रास,
मधूनच हुंद्क्यातून फुटत होता उच्छवास ,
मलूल तिच्या डोळ्यांनी धरली होती अश्रूंची कास,
केविलवाण्या चेहऱ्यावर दिसत होती आधाराची आस,
"सांभाळेल तिची मैत्रीण तिला..." वाटून ,तिच्या सोबत रडलो नाही
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
अनोळखी त्या चेहर्यावरही ओळखीचं स्मित होतं,
दूर बसणाऱ्या आमच्या मनातले अंतर मात्र एक दोनच वीत होतं,
ओळख आणि मग पुढे.....असा प्लान अगदी नीट होता,
पण असंच सगळं वाटणारा आणखी एक धीट होता,
"साला आपली line आहे " म्हणत, कधीच त्याच्याशी नडलो नाही
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
प्रेम म्हणजे मोहाचा एक खड्डा समजत गेलो,
अनपेक्षित दुख आणि काळज्यांचा अड्डा समजत गेलो,
हात धरून मारावी उडी त्या खडड्यात , असा कोणी भेटलं नाही
आकर्षण नावाच्या भासाला प्रेम म्हणून पुढे रेटलं नाही ,
उधार मिळाले असते पंख ,पण त्यासोबत कधी उडलो नाही
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
पण आम्हीच प्रेमात पडलो नाही
-- Omi
नाही हासणार मी, लोक लगेच मला
नाही हासणार मी, लोक लगेच मला 'बेफिकीर' म्हणायला लागतात मग!
(No subject)
एकाचवेळी आध्यात्म,
एकाचवेळी आध्यात्म, भौतिकशास्त्र, जैवविज्ञान आणि भूमिती यांची काशी केली आहे
ओंकार कविता खरच छान आहे.. थोड
ओंकार कविता खरच छान आहे.. थोड ते लिहीलेलं समजुन वाचाव लागतय.
आपरतिम...साहत्यांच नोबल
आपरतिम...साहत्यांच नोबल पारीतोसीक लागुन राहीले यासनी...
(No subject)
बेफ़िकीर | 4 January, 2012 -
बेफ़िकीर | 4 January, 2012 - 11:50 नवीन
>>नाही हासणार मी, लोक लगेच मला 'बेफिकीर' म्हणायला लागतात मग!<<
अहो तुम्ही कशाला हसताय. तुमची आणि तुमच्या कंपुची (कॉ.हा.) तर आता मजा होईल. एक नविन कवी दिसला तुम्हाला आता. यालाही लवकर पळवून लावा आता मायबोलीवरून. नाहीतरी तुमचा तोच धंदा झालाय सध्या. काय?
ती हलकीच होती
ती हलकीच होती कललेली....कदाचित,
हे कोणाबद्दल आहे??
प्रयत्न चांगला आहे, १५
प्रयत्न चांगला आहे, १५ तासामध्ये चांगलीच प्रगती आहे,
कविता आवडली. पण व्याकरणाच्या
कविता आवडली.
पण व्याकरणाच्या चुका माझ्यापेक्षाही जास्त आहेत
आशय"घन" कविता ! वाचून मन
आशय"घन" कविता ! वाचून मन "द्रवलं" माझं !
ओमकार कविता खुपच चांगली
ओमकार कविता खुपच चांगली आहे,टंकलेखनाच्या चुका सांभाळा.
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!
छान कविता, पुढिल लेखनासाठी
छान कविता,
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा! +१
ओमकार, छान प्रयत्न. पुन्हा
ओमकार, छान प्रयत्न. पुन्हा एकदा संपादन करून लेखनातल्या चुका सुधारून घ्या. सुरुवात आहे. हळूहळू अजून छान लिहू शकाल यात शंका नाही.
छान कविता, लेखनातल्या चुका
छान कविता, लेखनातल्या चुका सुधारून घ्या.
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा! +१+१
कविता खरच खूप छान आहे. मान्य
कविता खरच खूप छान आहे. मान्य आहे कि शुध्दलेखनात शिर्षकापासूनच खूप चुका आहेत. पण मराठी टायपिंगची सवय नसल्यास असे होणे सहाजिक आहे. पण सरावाने अशा चूका दुरूस्त होऊ शकतात. याचा अर्थ हा नव्हे की त्या कवीकडे प्रतिभा नाही किंवा ती कविता रटाळ आहे.
या कवितेवरील बरेच प्रतिसाद पाहून क्षणभर असे वाटले कि
एखादा सीमावर्ती तहानलेला भारतीय पाण्याच्या शोधात पाकिस्तानाच्या एखाद्या खेड्यात्त जावा आणि,
तेथील जमावाने त्यास हालहाल करून मारावे. अश्यातला हा प्रतिक्रियांचा प्रकार. मान्य आहे कि प्रतिक्रिया या नकारात्मकही असू शकतात वा असाव्यात, पण कशा बाबतीत? त्या कवितेच्या आशयाच्या, कविच्या प्रतिभेच्या बाबतीत.एखाद्या जून्या कवीच्या शुध्दलेखन चूकांबाबतीत देखील अश्या प्रतिक्रिया सहाजिक आहेत पण जे अगदीच नवखे आहेत त्यांच्या बाबतीत असे करणे कितपत योग्य आहे ते आपण समजावे. त्या चुका कवीच्या लक्षात आनून देणे वेगळे व त्यावरून त्याची कुचेष्टा करणे वेगळे असे आपणास वाटत नाही का?
शेवटी एव्हढेच म्हणेल कि प्रयत्न छान व प्रामाणिक वाटला. फक्त शुध्दलेखन चूका सुधाराव्यात.
प्रयत्न छान व प्रामाणिक
प्रयत्न छान व प्रामाणिक वाटला. फक्त शुध्दलेखन चूका सुधाराव्यात. >>>>> अनुमोदन
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा! +१+१+१
उधार मिळाले असते पंख ,पण
उधार मिळाले असते पंख ,पण त्यासोबत कधी उडलो नाही: सुंदर कल्पना.
छान
छान
१. ओम्कार मेथे, तुम्हाला काही
१. ओम्कार मेथे, तुम्हाला काही विशिष्ट अक्षरं अजून नवीन असल्याने लिहिता येत नाही, असे समजावे, तर तुम्ही तर एका ठिकाणी चुका करुन दुसर्या ठिकाणी तोच शब्द नीट तर लिहिलाय. जसे- 'ड' हे अक्षर तर तुम्हाला व्यवस्थित लिहायला येतेय की!!! शिवाय बरेच अवघड शब्दही तुम्ही 'अनवधानाने' व्यवस्थित बरोबर लिहिलेले आहेत.
२. जे जे शब्द नीट लिहिता येत नाहीत, म्हणून कंसात लिहिलेत, ते जसे स्पेलिंग, तसेच सुद्धा लिहायचा आपण प्रयत्न केलेला नाही. जसे- मंताला(manatale), स्साग्ला(sagala)
३. त्यामुळे तुम्हाला नीट मराठी लिहिता येत नसावे, असे मानायला मार्ग नाही. तुम्ही चेष्टा व्हावी किंवा चांगल्या शब्दात बोलायचे तर गंमत म्हणून असा आयडी घेऊन अशा चुका केल्या असू शकतात, असे वाटते. तसे असल्यास गंमतीत आम्हीही सामील होऊ.
तुम्ही केलेल्या गंमतीचा भाग सोडल्यास कवितेचा आशय चांगला आहे.
खुप सुंदर कविता.(प्रतिसादक
खुप सुंदर कविता.(प्रतिसादक म्हणजे गुरु काही प्रेमळ काही मारकुटे)लिहीत रहा.
प्रतिसादक म्हणजे गुरु काही
प्रतिसादक म्हणजे गुरु काही प्रेमळ काही मारकुटे: फालकोर यांचा प्रतिसादही मस्त. लक्ष्यात ठेवण्यासारखा.
वाटलं नव्हतं मराठी टंक लेखन
वाटलं नव्हतं मराठी टंक लेखन एवढा अवघड असेल
वाटलं नव्हतं पहिलाच कविता प्रकाशनाचा प्रयोग इतका वाईट फसेल..
वाटलं नव्हतं माझ्या बेफिकिरीची जाणीव करून देणारा "बेफिकीर" कोणी असेल
वाटलं नव्हतं अस सगळ होऊनही कौतुकाचा प्रतिसाद दिसेल
पण या सगळ्या मधूनही शिकलो एक धडा, आता असेल नवीन डाव
टंक लेखनाच्या चुका सांभाळून , आमचंही असेल नवीन नाव
कदाचित यामधून उघडेल तुमच्या सर्वांशी संवादाचे द्वार
सर्व चुकांबद्दल क्षमस्व आणि प्रशंसा बद्दल आभार
-बीज
आशय चांगलाच आहे. फक्त 'आम्ही'
आशय चांगलाच आहे. फक्त 'आम्ही' प्रेमात पडलो नाही.....पेशव्यांसारखे अनेकवचनात का बोलताय? जाँईंट वेंचर आहे का?
बीज,सकारात्मक दृष्टिकोन
बीज,सकारात्मक दृष्टिकोन आवडला.
पुढिल लेखनासाठी शुभेच्छा.