हास्य माझ्या प्रेमाचे

Submitted by सोनालि खैर्नार on 21 April, 2011 - 03:11

हास्य माझ्या प्रेमाचे

तिच्या त्या चाहुलिने मी पघळायचो असा
जशी त्या चहात साखर पघळते

तिच्या त्या विचारात मी मग्न व्हायचो असा
जसा तो भ्राम्हन पोथित होतो मग्न

प्रयत्न मी फार केले जवळ तिच्या जाण्याचे
तिच्याशी बोलण्याचे तिच्यात रमण्याचे

तिच्यासमोर जाण्याची भिती अशी वाटायची
हसुनी माझे दात पीवळे तिला दिसण्याची

जेम तेम जसे तसे गाठले मी प्रेम गडाला
शेवटी मग मी गेलो प्रपोज तिजला करायला

तिनेही मला तेव्हा साथ द्यायच ठरवल
दुसर्या दिवशी लगेच मला भैया म्हणुन रोखल

अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची
शेवटी मग मी आणली तीला साडी भाऊबीजेची....

गुलमोहर: 

अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची
शेवटी मग मी आणली साडी भाऊबीजेची.... >> व्वा व्वा निव्वळ अप्रतिम..! हेच खरे प्रेम तर!

अरे एक जबरदस्त कवि मायबोलीला लाभला आहे, आणि तुम्ही सगळे हसताय..! कोण कवि मांडेल असे परखड आणि सत्य विचार..!
(हसणे तसे आरोग्यास चांगलेच)

अभिनंदन सोनाली..!
पुलेशुच.

धन्यवाद!