सुटका

Submitted by राकेश भडंग on 29 May, 2011 - 19:36

सुटका

दुपारची शांतता एखाद्या गुहेसारखी
खिडकीबाहेर झुलणाऱ्या गव्हाच्या लोम्ब्या,
तू तेथे बसली आहेस शांत जुन्या कोपऱ्यात,

माझे मन भरकटत शेतात,
घराच्या सर्व खोल्या पार करीत
गुहेचा थंड गार काळोख ओंलांडत

सभोवतीचे सूर्यप्रकाशाचे तुकडे उचलून हातात
मी धावत सुटतो मोकळ्या माळरानात, उजाड तेकड्याभोवती

निळे आकाश खेचत जाते मला
वारा ढकलत जातो मला
तुझ्यापासून दूर... दूर...

पण प्राचीन आठवणीतून बाहेर येत
जेव्हा तू साद घालतेस खिडकीतून

जग थांबते स्तब्ध... नदी वळण घेते अचानक,
अन माझ्या मनाचा भोवरा फिरू लागतो तुझ्याभोवती.

राकेश भडंग
सैतानाची ख़ुशी कवितासंग्रह मधून

गुलमोहर: 
शब्दखुणा: