आवाहन
मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज / An appeal for blood (A+) in Mumbai
मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.
येत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर तातडीच्या कॉरोनरी आर्टरी आणि अॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे. या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.). त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का? ए पॉझिटिव (A+) रक्ताची गरज आहे.
'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११)
नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.
'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.
