शापित

शापित गावाची हिरकणी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 April, 2025 - 09:49

त्या उजाड माळावर
एक गाव शापित
करपलेली माणसं
कळकट घरं त्यात

राबतात दीसरात हात
नाही पोटभर पोटाला
फाटका देह, चिंध्या नेसूला
पण रोज नवं सपान गाठीला

कशाला दिली इथं
भूक, तहान, लाज
भागवाया ही चैन
तू कुठं लपला आज?

करपलेला माणूस
हतबल आहे जगाया
आंधळं सरकार इथलं
फुरसत कुठे पाहाया?

उघड्यावर गाव तरी
वाट कुणाला दिसेना
तहानलेल्या ओठांना
पाणी घोटभर मिळेना

शब्दखुणा: 

" शापित गड "

Submitted by श्रीमत् on 17 May, 2014 - 09:16

आज शुक्रवार असल्यामुळे कामं तशी कमीच होती. त्यात दुपारचा लंच आज जरा जास्तच हेवी झाल्यामुळे डोळ्यांवर पेंग येत होती. बॉसने आज ऑफ घेतल्यामुळे मीही रीलॅक्स होतो. आजुबाजुला पाहील तर सार ऑफिस आज रिकामी वाटत होतं. मार्केटिंगवाले केव्हाच पसार झाले होते. बाजुला परेराकडे पाहीले तर तोही फेसबुकवर ईमानेइतबारे लागला होता. मी सहजच त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो कोणत्यातरी ट्रेकचे फोटो शेअर करताना दिसला. मी न रहावुन विचारलेच,"अरे परेरा किधर गया था? वो भी ट्रेक के लिये साले ऑफिस की चार मंजीले चढते चढते तेरी फट जाती है. और ये पहाड तु खुद चढ गया?

विषय: 
शब्दखुणा: 

शापित यक्ष

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 31 January, 2011 - 08:13

मागील वर्षी मुलींच्या शाळेत गॅदरींग बघायला गेले होते. चित्रविचित्र पोषाखातले मुलांमुलींचे घोळके, पाल्यांचे कार्यक्रम बघण्यास उत्सुक पालक, स्वयंसेवक यांची लगबग सुरु होती. शिक्षकांची गडबड, संयोजकांची धावपळ आणि मुलांच्या किलबिलीने सर्व वातावरण भरुन गेले होते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - शापित