यक्ष गंधर्व इत्यादी - माहिती हवी आहे
आपल्याकडे पुराणकाळापासून यक्ष, गंधर्व यांचे उल्लेख सापडतात. गंधर्वांबाबत तर महाभारतातही आहेत. तर निव्वळ उत्सुकता म्हणून असं विचारायचं आहे की हे सगळे आणि अप्सरा आणि एकूणच देवलोक यात काही फरक आहे का.? यक्ष किंवा यक्षिणी, गंधर्व यांचं नेमकं काम काय असावं? अप्सरांबद्दल माहीत आहे ( तपभंग करणं किंवा एकूणच मनोरंजन तत्सम प्रकार) पण यक्ष आणि गंधर्वांची योजना काय असावी? तसंच इंद्र हे एक पद आहे. जो त्या पदावर विराजमान होतो तो इंद्र असं साधारणतः लॉजिक आहे. तर याबाबतही कुणाला काही माहीत आहे का.? यक्ष गंधर्व वगैरे प्रकार हे "देवांमध्येच" include आहेत की वेगळे आहेत.?