त्या उजाड माळावर
एक गाव शापित
करपलेली माणसं
कळकट घरं त्यात
राबतात दीसरात हात
नाही पोटभर पोटाला
फाटका देह, चिंध्या नेसूला
पण रोज नवं सपान गाठीला
कशाला दिली इथं
भूक, तहान, लाज
भागवाया ही चैन
तू कुठं लपला आज?
करपलेला माणूस
हतबल आहे जगाया
आंधळं सरकार इथलं
फुरसत कुठे पाहाया?
उघड्यावर गाव तरी
वाट कुणाला दिसेना
तहानलेल्या ओठांना
पाणी घोटभर मिळेना
सैरावैरा झपाटलेल्या आशा
धरतात फेर विहिरीच्या काठाला
जीवन जरासे तळाच्या आडोशाला
काढायचे कसे, नाही पायरी उतरायला
सरसावली एक मर्दानी, हिरकणी
म्हणाली गोंगाट नको, धीर धरा
उतरली विहिरीत पकडून चिरा
वदली, एकमेका साहाय्य करा
तहानली भांडी उतरली खाली
भरले जीवन तयांत तिने
शांतावला जीव कळशी,हंड्याचा
दोर पकडून चढले तडफेने
सा-यांच्या शेवटी भरला तिचा हंडा
चेहरा हासरा अन् भूतदया उरात
तोच असेल संचारला तिच्यात
रांजण भरले नाथांचे त्यानेच पैठणात
© दत्तात्रय साळुंके
२२-४-२५
हे पाहून अस्वस्थ झालो.
https://x.com/Shekharcoool5/status/1913886422509015506?t=Jh5OUkIWGhsMfZe...
आवडली. शेवटच्या ओळी सुंदर.
आवडली. शेवटच्या ओळी सुंदर. 'शापित' नाही हो खरी हिरकणी.
हिंमतीने श्रीमंत.
अर्थात, म्हणणे सोपे आहे. पण गरीबी हा शापच असतो हेच सत्य आहे.
सलाम!
सलाम!
छान आहे.
छान आहे.
रांजण भरले नाथांचे त्यानेच पैठणात>>>कवाधरून त्याची वाट पाहात आहे. कदाचित आम्ही "अनाथ" असल्यामुळे त्याचे दुर्लक्ष झाले असणार.
आंधळं सरकार इथलं
फुरसत कुठे पाहाया?>>> पूर्वी केव्हातरी फ्रांसची राणी म्हणाली होती, "ब्रेड नाही? केक खाना." तद्वत आपले सरकार म्हणते आहे, " पाणी नाही? उदंड आहे बिसलेरी, स्नान संध्या करायला, ती प्या ना."
छान कविता
छान कविता
व्हिडिओ पाहून खरच अस्वस्थ झालो
छान कविता!
छान कविता!