दिवाळी
दिवाळी फराळाच्या पाककृतींची यादी आणि नवीन 'जरा हटके' प्रकार
श्रावण संपला, गणपती झाले. नवरात्र झाले, आज दसरा आता वेध लागतिल ते दिवाळीचे
दिवाळी म्हंटल की आठवतात दिवे, आकाशकंदिल, फटाके, रांगोळ्या अणि भरपुर फराळ आणि मिठाई
दरवर्षी करंज्या, लाडु, शंकरपळे, चिरोटे, चकली, शेव, चिवडा असे फराळाचे पदार्थ आपण बनवतोच.
त्याच्या पाककृतीच्या लिंक्स ही इथे टाका. म्हणजे सगळे पदार्थ एकाच ठिकाणी पहायला मिळतिल. शोधाशोध वाचेल
त्याव्यतिरीक्त, काहितरी नविन, जरा हटके असे फराळाचे पदार्थ किंवा मिठाई कुणी बनवत असेल, किंवा नेहमीचेच पदार्थ पण जरा वेगळ्या स्वरुपात कुणी बनवत असेल तर इथे सुचवा. पाककृती योग्य जागी टाकुन त्याची लिंक इथे द्या
माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.