जलरंग

माझा जलरंगाचा जुना प्रयत्न

Submitted by वर्षा on 11 September, 2013 - 13:48

माझं एक फार पूर्वी, (दहावीत बहुतेक) जलरंगात केलेलं एक चित्र आईकडे सापडलं.
त्याआधी कधीतरी संडे ऑब्जर्वर मध्ये समीर माँडल या माझ्या आवडत्या आर्टीस्टची पानभर सेलिब्रिटी पोर्ट्रेट्स छापून यायची. डिंपल, मधुबाला, विश्वनाथन आनंद यांची ती अफाट पोर्ट्रेट्स मी किती जपून ठेवली होती.
त्यातल्या एकावरुन हे चित्रं काढलं होतं. She is supposed to be Madhubala...:)

शब्दखुणा: 

मोर - जलरंग

Submitted by अल्पना on 31 August, 2013 - 04:35

बर्‍याच दिवसांनी परत जलरंगामध्ये चित्र रंगवून बघितलं. जलरंगामध्ये रंगवता येत नाही म्हणून हे माध्यम गेले वर्षभर वापरायचं टाळत होते.

गेल्या महिन्यात नेटवर एका ब्लॉगमध्ये खूप सारे जलरंगामधले मोर दिसले होते. मी कितीतरी वेळ ते मोर बघत बसले होते. आपणही कधीतरी असं रंगवायचं हे त्याच वेळी ठरवलं. रंगवल्यानंतर इथे लिंक द्यावी म्हणून ते चित्र शोधत होते पण सापडलं नाही. काल खूप शोधल्यावर तो ब्लॉग सापडला आणि त्या ब्लॉगलेखिकेला /चित्रकाराला मी माझं चित्र दाखवून तिच्या बॉगची लिंक देण्याची परवानगी मागितली.

http://arealpe.wordpress.com/tag/peacock-watercolor-painting/ हे या मोरासाठीचं इंस्पिरेशन.

मै एक सदी से बैठी हुं

Submitted by अल्पना on 19 August, 2013 - 13:14

हँडमेड कागदावर जलरंग.
साईझ -अंदाजे ए-४ (अ‍ॅक्चुअली हा कागद गोलाकर आहे )
गेल्या ४-५ दिवसात मी यामिनी रॉय या चित्रकाराची काही चित्रं बघितली. अगदी कमी रेषांमधली साधी आणि तरी एकदम मनाला भिडणारी त्यांची चित्रं खूप आवडली. आपणही त्याच प्रकारे प्रयत्न करावा या विचाराने हे चित्र काढलं.

यामिनी रॉय (की जामिनी रॉय??? ) यांच्या चित्रातल्या बायकांना चेहरा असतो आणि खूप बोलके डोळे असतात. पण मी हे रेखाटल्यावर मला आत काही रंगवावं असं वाटलंच नाही.

DSCN1355_0.JPG

सुप्रभात...

Submitted by चिखलु on 26 August, 2012 - 23:49

सुप्रभात मित्रांनो!!!
या चित्रासाठी जल-रंग हे माध्यम वापरले आहे. पिवळा आणि काळा या दोन मुख्य रंगांसह लाल रंग छटा येण्यासाठी वापरला आहे.

Morning_Maayboli.JPG

दल सरोवर - दुसरा प्रयत्न

Submitted by अभिप्रा on 9 January, 2012 - 12:20

माध्यम : जलरंग
मूळ प्रकाशचित्र : http://www.maayboli.com/node/14320 ( चंदन, खूप खूप आभार)
मूळ फोटो खूपच सुंदर आहे, ते सौंदर्य चित्रात उतरवण्याची माझी योग्यता नाही. पण प्रयत्न केल्यावाचून राहवले नाही.

IMG_2576.JPGIMG_2575-1.JPG

गुलमोहर: 

निसर्ग चित्रे...

Submitted by सेनापती... on 29 December, 2011 - 21:07

आज सकाळी शमिकाने काढलेले जलरंग...

ही काही आधी काढलेली चित्रे..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - जलरंग