दिल से रे ....
व्हेलेंटाइन्स डे चं निमित्त साधून 1kW Creations ने रीलीझ केलेले 'फूल टू फिल्मी' कार्टून पोस्टर ..... Dil say re !
व्हेलेंटाइन्स डे चं निमित्त साधून 1kW Creations ने रीलीझ केलेले 'फूल टू फिल्मी' कार्टून पोस्टर ..... Dil say re !
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/64155
काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!
सहावीत असताना माझी शाळा बदलली आणि त्याचबरोबर पंधरा मिनिटात नाचत, बागडत दंगा करत शाळेत जाण्याची सवय सुटली. अर्थात, चालत केलेल्या प्रवासात जरी घर ते विक्रोळी रेल्वे स्थानक आणि दादरला उतरल्यावर शाळेपर्यंत, आणि मग पुन्हा संध्याकाळी शाळा ते दादर स्थानक आणि विक्रोळी स्थानक ते घर अशी भरीव वाढ झाली असली, तरी त्यातली मजा निघून गेली होती. कारण मज्जा करण्याची जागा आता "कधी एकदा स्टेशन/शाळा/घर गाठतोय" या जगप्रसिद्ध मुंबईछाप घाईने घेतली होती.