Making of photo and status : ७. गोलुमोलु

Submitted by सचिन काळे on 18 November, 2017 - 21:57

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

21231995_1623345441071268_7052962705107384335_n.jpgकाय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!

Making of photo and status :
कार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का? cute ना!! अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का? गोलुमोलू! हा! हा!! हा!!

हा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही!!!? आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले.

माझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल!! आता पहा! गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल? बरोबर!! आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना!!? इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, "काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? " हा! हा!! हा!!

आता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा! "येता का सोबतीला?" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं? तर "जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत." आणि ते पण कसं? तर जोडीनं!! म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय? तर दूध!! गोलुमोलुचं फेवरेट!! वर आपल्यालाच तो सांगतोय, "टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!" बघा ना! आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय.

तर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला? मग!!?.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत? दूध आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users