लेखनसुविधा

तडका - पदव्यांचे बनावटीकरण,...!

Submitted by vishal maske on 12 June, 2015 - 10:54

पदव्यांचे बनावटीकरण,...!

रोज नव-नवे नावं पाहून
पाहणारेही खिन्न आहेत
कित्तेकांच्या पदवीवरती
आता प्रश्नचिन्ह आहेत,.!

सिस्टम हाती आल्यावरती
हवी तशी पिळवता येते,.?
बोगसबाजी करून देखील
इथे पदवी मिळवता येते,.?

या बोगसबाजीनं कुणा-कुणाचे
चारित्र्यही गमावले आहेत,..!
अन् बनावट पदवी प्रकरणात
आता भुजबळही सामावले आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - नापासांसाठी

Submitted by vishal maske on 11 June, 2015 - 21:43

नापासांसाठी,...

विद्यार्थ्यांच्या कल्याणाला
वेळेवरतीच धावले आहे
अन् नापासांच्या हितासाठी
सरकारही सरसावले आहे

आता अॉक्टोबरच्या वेटिंगची
काहींना गरज भासणर नाही
अन् वर्ष वाया जाण्याची भीती
नापासांनाही असणार नाही,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कुकर्माचे दणके,...

Submitted by vishal maske on 11 June, 2015 - 11:04

कुकर्माचे दणके,...

विश्वास टाकलेले माणसंच
घोटाळ्यांनी बाटले आहेत
उतले आहेत-मातले आहेत
कुणी विवेकही कातले आहेत

उतलेल्या अन् मातलेल्यांचे
वारंवार जणू फणके असतात
मात्र ज्याच्या-त्याच्या कुकर्माचे
ज्याला-त्यालाच दणके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - महायुतीच्या नावानं,...

Submitted by vishal maske on 10 June, 2015 - 22:41

महायुतीच्या नावानं,...

सत्ता मिळविण्यासाठी जरी
गोडीनं एकवटलेलेे आहेत
तरीही मात्र सत्तेमधून
घटकपक्ष घटलेले आहेत

अस्तित्व टिकविण्यासाठी
कुणी अजुनही पीचत आहे
अन् महायुतीच्या नावानं
एकीचं बळ खचत आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मोबाईल वॉर

Submitted by vishal maske on 10 June, 2015 - 10:17

मोबाईल वॉर

माणसांशी माणसं आता
ऑनलाइन जोडू लागलेत
प्रत्यक्ष लढणारे माणसं
अप्रत्यक्षही लढू लागलेत

बदल घडवणारी पिढीही
मीडियावरती स्वार आहे
अन् दिवसें-दिवस वाढणारं
आता मोबाईल वॉर आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - समाजात वावरताना

Submitted by vishal maske on 9 June, 2015 - 22:41

समाजात वावरताना,...

आपण काय करतो याची
आपण जान ठेवली पाहिजे
सदविचाराची आपल्यातही
विवेकी ज्योत तेवली पाहिजे

मनी दुर्विचार पोसणारांनीही
आता दक्षता घ्यायला हवी
मनाची तर नाहीच नाही पण
जनाची तरी बाळगायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खेळातला आनंद

Submitted by vishal maske on 9 June, 2015 - 11:25

खेळातला आनंद

प्रत्येक खेळातला विजय
कुणाचाच निश्चित नसतो
मात्र केल्या कसरतीचा
परिणाम औचित असतो

प्रत्येक-प्रत्येक खेळामध्ये
जिंकण्यासाठी द्वंद्व असतो
मात्र जिंकण्यापेक्षाही कधी
जिंकवण्यातच आनंद असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - "भुज" बळ

Submitted by vishal maske on 8 June, 2015 - 21:53

"भुज" बळ

ज्यांनी घोटाळे केलेत
त्यांचेही घोटाळे होतील
ज्यांनी वाटोळे केलेत
त्यांचेही वाटोळे होतील

चोराच्या मनात चांदणंही
इथे असंदिग्ध टोचु लागेल
अपराध घडला असेल तर
"भुज" बळही खचु लागेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - करिअरच्या पाऊलखुणा

Submitted by vishal maske on 8 June, 2015 - 11:01

करिअरच्या पाऊलखुणा

विध्यार्थ्यांच्या भविष्याचे
निकालातच मंथन असते
यशस्वीतांचे अभिनंदन तर
अयशस्वींचे सांत्वन असते

कुणाचे आनंद फुलून येतात
कुणाचे आनंद ग्रासुन जातात
मात्र करिअरच्या पाऊलखुणा
निकालातुनच दिसुन येतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निष्कर्ष पहिल्या पावसाचा

Submitted by vishal maske on 7 June, 2015 - 21:29

निष्कर्ष पहिल्या पावसाचा

प्रतिक्षेतला पहिला पाऊस
अगदीच वेळेवरती आला
कुणाचा आनंद हिरावणारा
तर कुणासाठी स्फुर्ती झाला

कुठे आनंद दिला आहे तर
कुठे नुकसानही केलं आहे
पहिल्या पावसाच्या निष्कर्षाला
आनंदासह दु:खही ओलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा