कसरत,...
जिकडे रग असेल तिकडे
प्रत्येकाचाच ओघ असतो
हव्या असलेल्या बाबींचाही
कधी योगा-योग असतो
कुणाचे शरीर ओसरत असते
कुणाचे शरीर पसरत असते
मात्र सशक्त शरीरासाठी
अत्यावश्यक कसरत असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
नैसर्गिक पंचनामा,...!
कुणी कुणाला दोष दिले तर
कुणी जबाबदारीच झटकली
मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामांची
गोष्ट सगळ्यांनाच खटकली
जोरदार पडल्या पावसाने
बहारदारच हंगामा झाला
अन् केल्या कामांचाही जणू
नैसर्गिकच पंचनामा झाला,..!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पावसाच्या औचित्याने
आनंद घेणार्या मनांचीही
आता दैना केली आहे
वाट पाहिलेल्या पावसाने
जणू वाट लावली आहे
पावसाची अतिवृष्टी होणं हे
दैनंदिनीलाही अडलेलं आहे
अन् पावसाच्या या पडण्याने
राजकारणही घडलेलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मुंबई बंद,...!
मुंबई बंद ठेवण्यामागेही
वेग-वेगळे कारणं आहेत
अन् निसर्गाच्या वर्षावासह
कुकर्मिक मानवी वर्ण आहेत
करून दाखवलेल्या कामांचं
दर्जेदारपणही भेदलेलं आहे
अन् पावसा पेक्षाही जास्त
नाल्यांनी लक्ष वेधलेलं आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शिक्षणाच्या बाजारात,...
कुणी चुकून शिकले आहेत
कुणी शिकून चुकले आहेत
बोगजबाजीच्या बाजारात
कुणी शिक्षणच विकले आहेत
शिक्षणाच्या बाबतीत तरी
अशी कुठेच ना खाच पाहिजे
विकणारांना तर नाहीच नाही
पण घेणारांना तरी लाज पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भानगड खर्चाची
ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो
मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भानगड खर्चाची
ऐपत जर असेल तर
खर्च कुठेही करता येतो
विनाकारण खर्चाचाही
कधी भुर्दंड भरता येतो
मात्र ऐपत जर नसेल तर
गरजांनाही शमवावं लागतं
अन् काहीतरी गमवण्यासाठी
काहीतरी कमवावं लागतं,...!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विजयाचे गुपित
धनुष्याच्या बाणापेक्षाही
घड्याळी काटे धावले आहेत
कर्तबगार क्लुप्ती मुळेच
यशाची दारे गोवले आहेत
पवारांच्या या पावर मुळे
चाहत्यांचा फूलता श्वास आहे
मात्र घड्याळी विजयालाही
म्हणे कमळाचाच वास आहे,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
संपत्तीचे गुपित,...?
ज्यांना जाणते म्हटले
तेच जणू लबाड आहेत
भ्रष्टाचारी कमाईचे म्हणे
त्यांच्याकडे घबाड आहेत
लबाडाच्या घबाडाचा हा
ताजा-तवाना किस्सा आहे
भुजबळांच्या संपत्तीत म्हणे
भ्रष्टाचाराचा हिस्सा आहे,...?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य चौकशीचे
प्रत्येकाच्या कर्माचे परिणाम
ज्याला-त्याला धडकले जातात
अन् घोटाळेखोरांचे घोटाळेही
वाटोळ्यांत अडकले जातात
मनी लालसा जोपासणारे
मना-मनात निदण असते
अन् कुणी किती खाल्लं याचे
चौकशीअंती निदान असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३