तर आपणा पैकी अनेक जण अग्निहोत्र परत पाहायला लागले असतील. ही जेव्हा पहिल्यांदा कास्ट झाली तेव्हा काही मी बघितलेली नव्हती. आता
इथलेच वाचून परत चालू केलेली आहे. तर हा पिसेकाढू विनोदी धागा आहे. सिरीअसली घेउ नका. व्याख्या विक्की वुक्ख्हू.
भागवाइज परीक्षण चालू करते. गजानना गजानना.
मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला.