नविन

हात तुझा हातात होता

Submitted by राजेंद्र देवी on 24 August, 2013 - 12:47

हात तुझा हातात होता....

हात तुझा हातात होता
ऋतू पण ऐनभरात होता
लागली चाहूल वसंताची
कोकिळ पण स्वरात होता

हात तुझा हातात होता
जलमेघ अंबरात होता
बरसला मनभावन
श्रावण दारात होता

हात तुझा हातात होता
तळपता तारा ज्वरात होता
तुझ्या प्रेमाच्या सावलीत
जीव माझा स्थिरावत होता

हात तुझा हातात होता
काजवा तिमिरात होता
कळले ना कधी चंद्रमा
पश्चिमेच्या पदरात होता

हात तुझा हातात होता
ओठात अमृतानुभव होता
कळले ना कधी
समर्पणाचा ठहराव होता

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

एका लग्नाची............ (१)

Submitted by सु_हा_स on 26 December, 2011 - 05:31

सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व !

कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते ....

" राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे "
" मुख्य तरुंगाधिकारी !! "
" हा येडा झालाय ! "
" चढलीय भें** ला ! "
" माझी तर उतरलीच, अजुन क्वार्टर मागव ! "

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विसरलोच की...

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2011 - 04:41

विसरलोच की...

राग........द्वेष
सुख......दु:ख
स्तुती......निंदा
आशा......निराशा
कुठल्या तीरांचा वेध घेतोय मी.. ?
कशाला आदळतोय मी या तीरावर नाहीतर त्या ?
का या सगळ्या गडबडीत,
पोहोणेच विसरलोय मी..... ?

गुलमोहर: 

काज पांडुरंगाचे....

Submitted by पुरंदरे शशांक on 15 April, 2011 - 03:29

काज पांडुरंगाचे....

कटेवरी हात | विचाराल मात | पाहतसे वाट | भक्तांची मी ||

कुठे गेला ज्ञाना | नामाही दिसे ना | टाहो ऐकू ये ना | तुकयाचा ||

आता येथ सारी | गर्दीचीच वारी | नावा वारकरी | उरलासे ||

भक्तीचा जिव्हाळा | नामाचा उमाळा | सकळ लोपला | इये काळी ||

काय उरलेसे | काज ते कोणते | मजलागि निके | कळेचिना ||

परि कोपर्‍यात | दिसे कोणी गात | पूर्ण तो भावात | बुडालेला ||

असोनी आंधळा | भक्तिचा तो मळा | दिसे की फुलला | परिपूर्ण ||

होवोनी तल्लीन | गातसे भजन | पूर्ण एकतान | वांछाहीन ||

तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||

गुलमोहर: 

वाचवा हो वाचवा.....

Submitted by पुरंदरे शशांक on 28 March, 2011 - 03:33

वाचवा हो वाचवा.....

अनेकजण वाहवा करत होते म्हणूनच खरं तर
धजावलो त्या अथांग कवितेच्या डोहात उडी मारायला..
उडी मारली मात्र...
कुठंय ते सगळे वर्णन करत होते ते - अनुपम सौंदर्य, वगैरे....
इथे नाकातोंडात शब्द जाऊन जीव गुदमरलाय नुसता !

शिवाय काय आशयघन का काय म्हणत होते ?
मला तर केवढे टेंगूळ आलंय त्या अर्थाला धडका मारुन..

अन् अंगही सोलपटून गेलंय पार .....
त्या अणकुचीदार, टोकदार उपमा, अलंकारांनी !

वाचवा हो वाचवा मला कुणीतरी
या अथांग, अगम्य कवितांपासून.....

बाळासाठी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 December, 2010 - 09:33

बाळासाठी.......

एक दाणा ..... चिऊसाठी
एक घरटे ...... काऊसाठी

एक घास ..... हम्मासाठी
एक वाटी ...... माऊसाठी

एक बिस्किट ...... भू भू साठी
एक अंगाई ......... चांदोबासाठी

एक गाणे ...... बाळासाठी
गोड गोड ...... पापीसाठी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अवघा मी

Submitted by पुरंदरे शशांक on 7 December, 2010 - 08:37

अवघा मी

आता आताशा वाटते
दूर जावे प्रवासाला
अदृश्यसे ओझे फेकून
हलकेच फिरायला

ओस माळरानातून
खोल दर्‍याखोर्‍यातून
गर्दशा झाडोर्‍यातून
कधी तप्त वाळूतून

मुक्काम कुठे का ठोकावा
जीव उगा का गुंतवावा
चरैवेति चरैवेति
मंत्रच सदा जपावा

दूर दूर जाता जाता
मातीशीही मैत्री व्हावी
वार्‍यासवे भरारत
पावसासंगे मस्ती हवी

सार्‍यांच्या साथीने
मी माझे गळून जाता
देहकोष होता दूर
होईन मी त्यां सारखा

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नविन