कवितेचे नाव बदलून

अवघा मी

Submitted by पुरंदरे शशांक on 7 December, 2010 - 08:37

अवघा मी

आता आताशा वाटते
दूर जावे प्रवासाला
अदृश्यसे ओझे फेकून
हलकेच फिरायला

ओस माळरानातून
खोल दर्‍याखोर्‍यातून
गर्दशा झाडोर्‍यातून
कधी तप्त वाळूतून

मुक्काम कुठे का ठोकावा
जीव उगा का गुंतवावा
चरैवेति चरैवेति
मंत्रच सदा जपावा

दूर दूर जाता जाता
मातीशीही मैत्री व्हावी
वार्‍यासवे भरारत
पावसासंगे मस्ती हवी

सार्‍यांच्या साथीने
मी माझे गळून जाता
देहकोष होता दूर
होईन मी त्यां सारखा

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कवितेचे नाव बदलून