राव पाटील

उपभोग स्वातंत्र्याचा...

Submitted by अजिंक्यराव पाटील on 20 October, 2023 - 16:44

कॉलेजच्या मुलामुलींची पार्टी सुरु होती. शिमला छान तयार होऊन आली होती. राघूच्या वाढदिवसाचं निमित्त.. शिमला आधीपासून जरा बोल्ड. त्यात राघुवर डोळा आधीपासून होता तिचा. शिमला दिसायला तशी छान होती. शिमलाची आई म्हणजे जाई मॅडम तश्या फार शिस्तीच्या पण कुठे कसं वागावं ते त्यांना नीट कळायचं. कॉलेजच्या अडनिड्या वयातल्या मुलामुलींशी कसं जमवून घेत समजवायचं ह्याच भान त्यांना होतं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीच्या लोकप्रिय होत्या.. म्हणूनच कि काय आजदेखील ह्या मुलांनी त्यांना पार्टीतही इन्व्हाईट केलं होतं.

विषय: 

कोंबडी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 24 December, 2019 - 06:25

नुकतीच मारुतीच्या देवळात आरती झाली होती. पारावर नेहमीचीच चार सहा डोकी फाकाल्या मारत बसली होती. पारावर जमिनीच्या वर आलेल्या पिंपळाच्या दोन जाडजूड मुळ्यांनी खुर्चीगत खोबण तयार झाली होती. त्या खोबणीत, मळकट धोतर, वर एक बंडी, आणि डोईवर कसंतरीच गुंडाळलेलं पटकं, (जे, डोकं झाडाला टेकून रेलून बसल्यामुळे आता डोळ्यांवर आलं होतं) धारण केलेला एक काटकुळा देह आपली पाठ टेकवून निवांत बसला होता.

विषय: 
शब्दखुणा: 

मागील पानावरुन

Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 November, 2019 - 13:16

प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/72206

मागील पानावरुन पुढे चालू..

रात्री त्याचा मेसेज आला पुन्हा (इथून पुढे chat आहे, समजून उमजून वाचा, तो आणि ती लिहीत बसणार नाही मी).
"ताय तलतेय मादी दब्बू?" (काय करतेय माझी गब्बू?)

"दब्बू शिशी कलतीये, वास आला ता तुला बबदू?"

"हादायला दाताना कताला नेला फोन दब्बू?"

"मला वाटलं तुदा कॉल येनाल म्हणून फोन देतला तोबत.."

"मग आता फोन आणलाच आहे तर.."

"हो पाठवते."
खिचिक

विषय: 
शब्दखुणा: 

काहीतरी आणि गझल

Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 October, 2019 - 02:23

"तसं मी आधीच क्लिअर केलं होतं तुला, तरीही तुला का अशी भीती वाटतेय? मला तुझ्या past बद्दल काहीही हरकत नव्हती तेव्हा सुद्धा, आणि आजही नाहीये.. रावी मी तुला तुझा present मागितला होता, आणि future आपलं सोबतच राहिलं असतं याची खात्री होती..

"मग का घेतलेला तू तो gap?"

"कारण तू लहान होतीस, तुझं शिकायचं वय.. मला वाटलेलं तू कमिट केलंय एकदा तर काय पुन्हा पुन्हा insecure feel करत राहायचं. विश्वास होता माझा, स्वतःवर आणि तुझ्यावर"

विषय: 
शब्दखुणा: 

सावळी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 23 September, 2019 - 14:53

सावळ्या रातीचं दुधाळ चांदणं
दिलंय आभाळानं तुलाच आंदण
बहरे तुळस सारल्या अंगणी
तसंच वाटे तुझं गं बोलणं

नजर तुझी शांत आसमंत सारा
सांजंच्या पारंला जणू फुलतो मोगरा
काळ्याशार केसांत जीवच अडतो
खट्याळ तुझं हसू जणू मोर तो नाचरा..

चेहरा गं तुझा पाडी चांदव्याला खळं
पाहून तुझ्याकडं सये जीव त्याचा जळं
नाजूक जिवणी तुझी उमलती कळी
लोभस गं रूप तुझं लावी नजरेला टाळं

रात रात न ये झोप सये फक्त तुझी याद
कसा लागलाय जणू माझ्या जिवा तुझा नाद
रुपानं या तुझ्या मांडलाय असा छळ
फक्त तूच की समोर काय दिस काय रात

विषय: 
शब्दखुणा: 

मोजदाद

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 September, 2019 - 13:26

तुझी माझी सये एक,
गोष्ट कधीच सरलेली,
तरी देखील कधी कधी
दोघांच्यात उरलेली

डोळ्यातून डोळा चुकवून
वाहे एक चुकार आसू
पुसता पुसता त्याला
ओठी फुटते उगाच हासू..
हसू आणि आसवाच्या
आसपास हरवलेली.....

जुनी पुराणी पत्रे आणि
पारावरले भकास गाणे,
उदास पिंपळ झाकोळणारा
अन डोळ्यात तुझे तरळून जाणे
कोरड्या पिंपळपानासारखी
चाळण मनाची झालेली

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - राव पाटील