उपभोग स्वातंत्र्याचा...

Submitted by अजिंक्यराव पाटील on 20 October, 2023 - 16:44

कॉलेजच्या मुलामुलींची पार्टी सुरु होती. शिमला छान तयार होऊन आली होती. राघूच्या वाढदिवसाचं निमित्त.. शिमला आधीपासून जरा बोल्ड. त्यात राघुवर डोळा आधीपासून होता तिचा. शिमला दिसायला तशी छान होती. शिमलाची आई म्हणजे जाई मॅडम तश्या फार शिस्तीच्या पण कुठे कसं वागावं ते त्यांना नीट कळायचं. कॉलेजच्या अडनिड्या वयातल्या मुलामुलींशी कसं जमवून घेत समजवायचं ह्याच भान त्यांना होतं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीच्या लोकप्रिय होत्या.. म्हणूनच कि काय आजदेखील ह्या मुलांनी त्यांना पार्टीतही इन्व्हाईट केलं होतं. शिमलाने त्यांना विचारून १ पेग स्मर्नोफ ग्रीन ऍपल in ऑरेंज ज्यूस आणि, तिचा आवडता smirnoff वॅनिला in malibu rum topped with coco water घेतलं होतं बनवून. हे कॉकटेल तिला तिच्या आईने म्हणजे जाई मॅमने शिकवलं होतं. हळूहळू पार्टीत रंग चढत होता. राघू तसा जरा बिचकत बिचकत शिमला जवळ आला आणि त्याने आपल्या हातातला ऑरेंज ज्यूस तिला ऑफर केला. शिमला ने हसून त्याला नाही म्हटलं आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिली.. राघुने हा क्यू घेतला आणि डान्स साठी विचारलं. त्यांची जोडी तशी छान दिसत होती. इतक्यात इतर मुलांसोबत जाई देखील त्यांना जॉईन झाल्या.. कधी नव्हे ते पहिल्यांदा शिमला जरा लाजली होती.. तिच्या पोटात उडणारी फुलपाखरं जाईला दिसली. जरा वेळाने डान्स संपल्यावर, जाईने शिमलाला जवळ घेऊन एकट्यात विचारलं..

"काय चाललंय शिमलाबाई? आज जरा हरवल्यासारकाही वाटत आहेस.. काही बोलायचं असलं तर तू मला बोलू शकतेस.. जज नाही करणार मी तुला, नेहमीप्रमाणेच..."

शिमला: आई, अगं कसं सांगू.. माझा जरा गोंधळ उडाला आहे बघ.. आता हा रघु.. मला आवडतो हा. पण याच्यासोबत आयुष्य काढायचं कि कस ते कळत नाहीये.. मला मघाशी नाचत नाचता propose केलं त्याने.. सांग ना आई तुला काय वाटतं ?

जाई: हम्म.. म्हणून इतकी फुलपाखरं उडत होती तर... आई म्हणून माझी परवानगी याबाबतीत तुला मागावीशी वाटली तर खरं तर मला वाईट वाटेल बघ.. मी तुला जे शिकवायचं ते सगळं शिकवलंय. आजवर जसे आपले बारीक सारीक निर्णय तू तुझ्या विवेकबुद्धीने घेतलेस, तसाच हाही निर्णय तुलाच घ्यायचा आहे. इतकंच सांगेन, जास्त विचार करू नकोस, जरा वेळ द्या एकमेकांना, त्याच्या मनात काय काय आहे ते जोखशीलच तू. आणि निर्णयाची कसली घाई... हे काही १९वं शतक नाही कि कॉलेज झाल्याझाल्या संसाराच्या गोष्टी सुरु... अर्थात तसं करायचं असेल तरी माझा तुला पाठिंबाच असेल. स्वत:ला जप आणि एन्जॉय कर.. आणि हो, शुद्धीत राहणार असशील तर अजून एक कॉकटेल बनव, फक्त त्यात एक मिरची उभी चिरून घाल, एक तुकडा माझ्या ग्लासात, एक तुझ्या...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अजिंक्यराव पाटील ये बात कुछ ख़ास जम्या नही इस बार. आधी काही विडंबन होत्या /आहेत मायबोलीवर त्याची सर नाही आली इकडे .... दारुवरती सर्व फोकस झालाय फक्त असे वाटले. जमल्यास पुनर्लेखन करायचं मनावर घ्या.

खरंतर विडंबन म्हणून लिहायला सुरू केली, पण जो भाग माणूस म्हणून खटकत होता जसे की न बोलवता पार्टीत शिरलेली आई, आजच्या काळाला न शोभणारी मुळुमुळू मुलगी, भर पार्टीत आपल्याच मुलीचा पाणउतारा करणं, पाल्यासाठी आपण निर्णय घेणं वगैरे बदललं फक्त. हो विडंबन म्हणून हुकलंय जरा.

आणि मूळ लेखकाने देखील विडंबन केलं आहे, गोविंदा, राजेश खन्नाचा स्वर्ग नावाचा दवणीय चित्रपट होता, त्यातला प्रसंग उचलला आहे. बघा 35वे मिनिट

हो. हे विडंबन नाही. असलंच तर फक्त पात्रांच्या नावांत आहे. त्या कथेवरून प्रेरणा घेऊन लिहिलंय असं म्हणता येईल.

आणि मूळ लेखकाने देखील विडंबन केलं आहे, गोविंदा, राजेश खन्नाचा स्वर्ग नावाचा दवणीय चित्रपट होता, त्यातला प्रसंग उचलला आहे. बघा 35वे मिनिट>> असा प्रसंग बागबान चित्रपटात देखिल आहे.

हो, पण त्यात पार्टी करणारे वाईट तरुण आणि त्यांना वठणीवर आणण्यास सारसावलेली आई असा प्रसंग घेणे हे म्हणजे व्हिलन मेलेला समजून हातातील शस्त्र खाली टाकल्या नंतर व्हिलन पुन्हा उठतो आणि हॅप्पी एडिंगसाठी आवश्यक नसणारी व्यक्ती पुढे येऊन बलिदान देते असा प्रसंग घेण्याएवढे कॉमन नाही का होणार?

आणि मूळ लेखकाने देखील विडंबन केलं आहे, गोविंदा, राजेश खन्नाचा स्वर्ग नावाचा दवणीय चित्रपट होता, त्यातला प्रसंग उचलला आहे. >>> असे असेल तर लेखक महोदय इकडे जशी परवानगी देण्याबाबत आग्रही राहिले तसे त्या चित्रपट निर्मात्याची त्या प्रसांगा वरती विडंबन करण्यास परवानगी नक्कीच घेतली असणार Light 1

आणि मूळ लेखकाने देखील विडंबन केलं आहे, गोविंदा,
राजेश खन्नाचा स्वर्ग नावाचा दवणीय चित्रपट
होता, त्यातला प्रसंग उचलला आहे. बघा 35वे मिनिट >> तो केवळ योगायोग आहे. मी आजवर असा चित्रपट पाहिलेला नाही. जर मी स्वतःच विडंबन केलं असतं, तर माझ्या परवानगीशिवाय हा लेख लिहील्या बद्दल माझं काहीच म्हणणं असण्याचं कारण नाही.

•••••••

असे असेल तर
लेखक महोदय इकडे जशी परवानगी देण्याबाबत
आग्रही राहिले तसे त्या चित्रपट निर्मात्याची त्या
प्रसांगा वरती विडंबन करण्यास परवानगी नक्कीच
घेतली असणार >> नाही मी परवानगी घेतलेली नाही. वर खुलासा केला आहे. आणि मी परवानगी बाबत आग्रही असल्याचं आपल्याला समजलं म्हणजे तुमचं बऱ्याच ठिकाणी लक्ष दिसतं. एवढा मोकळा वेळ आहे तुमच्याकडे ??

असा बेकायदेशीर, अर्थहीन लेख वाचण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार, वाचनीय असं वाचण्यासाठी :-
https://www.maayboli.com/node/84277

खरंतर ही लिंक इथे देऊन फारसा फायदा होणार नाही, हे मला ठाऊक आहे. कारण लेखक स्वतःच हा लेख डिलीट करणार आहेत. तरी...

असा बेकायदेशीर, अर्थहीन लेख वाचण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार, वाचनीय असं वाचण्यासाठी :-
https://www.maayboli.com/node/84277
>>>>
दर्जेदार ??? कोणी ठरवले / कोण ठरवते ?? मला आजपर्यन्त वाटत होतं वाचकांचा उत्स्फूर्त आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद त्या लेखकाला आणि त्या लिखणाला दर्जेदार ही मान्यता देत असतो, दुसरे म्हणजे काही पुरस्कार मिळाला आहे का ह्या लिखणाला ?? मग काय आपले आपणच ठरवायचं का दर्जेदार लिखाण म्हणून !!

खरंतर ही लिंक इथे देऊन फारसा फायदा होणार नाही, >>> देत चला ओ, तेव्हढाच विडंबनासाठी आयता खुराक मिळेल इकडे उत्सुक मंडळीना

असा बेकायदेशीर, अर्थहीन लेख वाचण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार, वाचनीय असं वाचण्यासाठी>> लेखकाने स्वतःच आपल्या लिखाणाला दर्जेदार ठरवण्यापेक्षा ते वाचकांवर सोडून द्यावे हे मी एक वाचक म्हणून नम्रपणे सांगु इच्छितो..

दर्जेदार ??? कोणी ठरवले / कोण ठरवते ?? मला
आजपर्यन्त वाटत होतं वाचकांचा उत्स्फूर्त आणि
पॉझिटिव्ह प्रतिसाद त्या लेखकाला आणि त्या
लिखणाला दर्जेदार ही मान्यता देत असतो, दुसरे
म्हणजे काही पुरस्कार मिळाला आहे का ह्या
लिखणाला ?? मग काय आपले आपणच ठरवायचं का
दर्जेदार लिखाण म्हणून !! >> माझ्या लेखनाच्या दर्जाविषयी मला खात्री आहे. त्याबद्दल इतर कुणी काही ठरवण्याची आवश्यकता नाही. वाचक आपलं मत मांडू शकतो. आवडलं तर कौतुक करू शकतो किंवा नाही आवडलं तर तसं सांगू शकतो ; पण काही वाचकांना एखादी कथा वा लेख नाही आवडला तर तो दर्जाहीन होत नाही. कुठलीही मान्यता वैगेरे देण्याइतकं कुणी मोठं नसतं.

@ वीरु - गैरसमज करून घेऊ नका सर ; पण कथा दर्जेदार असल्याची माझी खात्री नक्कीच आहे. हो त्यात काही त्रुटी नक्कीच असू शकतील. काही, किंवा खूप साऱ्या सुधारणा करण्याची गरज असेल. तशा त्रुटी दाखवून देण्याचा वाचकांना नक्कीच अधिकार आहे. वाचकांमुळेच एखादा व्यक्ती लेखक होतो हेही मला मान्य आहे. त्याबद्दल माझं काहीही म्हणणे नाही. सुधारणा करत राहण्यासाठी मी नेहमीच एक लेखक म्हणून तत्पर राहिल ; पण म्हणून माझं लेखन निकृष्ट दर्जाचे तर होत नाही ना.