Submitted by अजिंक्यराव पाटील on 2 March, 2025 - 22:47
साध्याशा साडीतली, सावळीशी रजनी; उमदा, राजबिंडा राजेश. पार्टीतल्या सर्वांचं लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या निखळ आनंदाकडे, आनंदी जोडप्याला बघून जळफळणाऱ्या गर्भश्रीमंत कामिनीकडे पहिल्यांदाच दुर्लक्ष होताना पाहून, तिने ठरवलं आणि..
नियतीने कौल दिल्यागत बॉल करणाऱ्या राजेशची नजर कामिनीच्या नजरेत गुंतणे ते परवा त्याला आपल्या बेडमध्ये घेऊन कामाग्नी विझवणे यात केवळ 4 दिवसांचे अंतर होते. आपल्या मादक शरीराचा सार्थ अभिमान तिला होताच. राजेश तिच्या मायावी रूपाच्या मोहात न पडता तर तो मर्दच कसला? पण..
काल सुखाच्या परमोच्च क्षणी तिच्या अनावृत्त शरीराकडे न पाहता डोळे मिटून तो "रजनी" म्हणत स्खलित झाला आणि..
आज स्वतःच्या हाताने सुंदर केस लुचून कामिनी जैन साध्वी कामिनी होत होती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हुक्लि
हुक्लि
मस्त.
मस्त.
28 आणि 71 की आहे
28 आणि 71 काय आहे
@diggi शब्द संख्या- उडवायची
@diggi शब्द संख्या- उडवायची राहिली
छान.
छान.
तिसऱ्या पॅरात माझ्या ऐवजी तिच्या असायला हवं होतं का! गोष्ट सांगताना लिहितो तसं ,की कामिनी सांगतेय..
छान जमलीय!
छान जमलीय!
धन्यवाद
धन्यवाद