नमस्कार,
युगांतरकरता इतका सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
महाभारत लिहिताना युगांतर कथा १०० भागांहून अधिक होईल, असे दिसते आहे. त्यामुळेच, पहिले ४५ भाग online पोस्ट केलेले आहेत, जे तुम्ही फेसबूकवर 'युगांतर {भाग क्रं.}' सर्च करून मिळवू शकता अथवा मायबोलीवर माझ्या लेखन धाग्यांत वाचू शकता. 
अर्जुनने लांबूनच एकदा वरती फिरणाऱ्या मत्स्याकडे नजर टाकली आणि पाण्याच्या पात्राजवळ आला. धनुष्य-बाण घेऊन गुडघ्यावर बसला. प्रतिबिंबाला न्याहाळू लागला. त्याने प्रत्यंचेवर बाण ताणला. मत्स्यावर.... मत्स्याच्या डोळ्यांवर त्याने चित्त एकाग्र केले; आणि आता त्याला मत्स्याचा डोळा सोडून बाकी काहीही दिसत नव्हते!
त्या वर फिरणाऱ्या खोट्या मत्स्याला खोटं अंधत्व बहाल करत अर्जुनाच्या हातून सुटलेल्या बाणाने पण पुर्ण करत नयनभेद अचूकपणे पार पाडला होता.
"म्हणजे? अनुज? लाक्षागृहातून अर्जुन खरचं वाचला?" बलरामाने अर्जुनाकडे पाहात विचारले.
"मी कधी तुमच्याशी असत्य बोलतो का दाऊ?"
युगांतर - आरंभ अंताचा!
भाग ४४
फुलांच्या, सोन्याच्या माळांनी भरलेल्या चहूबाजू आणि मखमली गालिचे टाकलेले भव्य सभागृह! अत्यंत सुंदर कलाकुसरीचे सुशोभीकरण त्याला शोभून दिसत होते. मध्यभागी एक सुंदर गोलाकार पात्र होते.... नितळ पाण्याचे! कडेच्या तबकात विशाल आणि सुबक धनुष्य काही बाणांसोबत विराजमान होतं.
"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."
भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.
कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.
युगांतर- आरंभ अंताचा
भाग ४१
"माताश्री, तुम्ही भ्राताश्रींना सांगून ठेवा, सगळी कडे शक्ती दाखवून काम करायची नाहीत म्हणून. पुन्हा सगळं नव्याने उभारावे लागते नविन ठिकाणी स्थलांतर करायचे म्हणले की."
"माताश्री, अर्जुनाला सांगा की लाकडं गोळा करण्याचे काम त्याने स्वतःच करावे. मला मदत मागितली तर मी माझ्या पद्धतीनेच काम करणार."
"पण भ्राताश्री, म्हणून अख्ख झाड उचलून आणायचं? आजूबाजूचे नगरवासी 'आ' वासून बघत होते."
"आणि जसं काय तू कधी नेम धरून फळं पाडतच नाहीस. तुझा अचूक नेम पाहून कोणालाच कळणार नाही आपल्याबद्दल असं वाटतं का तुला?"
"हे बघा भ्राताश्री....."
गुरु द्रोणांनी केलेला अपमान आणि अर्जुनाचे बाण द्रुपद राजाचे मन घायाळ करून गेले होते. जखम काही केल्या भरत नव्हती. अर्ध राज्य गेल्याचे जितके दु:ख त्याला नव्हते तितके दु:ख अपमानाचे वाटत होते. त्याने यज्ञकुंडातील लाकडांच्या काटक्यांवर आग पेटवली..... त्याच्या हृदयात आधीपासून लागलेली! आणि अखंड यज्ञ सुरू केला. अग्निच्या ज्वाळा त्याच्या अपमानाइतक्या तिव्र झाल्या.
'याच! अश्याच धगधगत्या ज्वाळांमध्ये द्रोणाला जळताना पाहायचे आहे मला.....'
गडद निळ्या रंगाने सजून कृष्णमय झालेल्या पहाटेने सृष्टीला हलका दवांचा मारा करत जागे केले. पक्षांची किलबिल सुरू झाली तशी साऱ्या नगराला जाग आली. द्वारकेच्या महालातील कृष्णाचा कक्ष कर्णमधुर सुरांनी व्यापलेला होता.
पूर्वेचे सुर्यकिरण कक्षभर पसरतील अश्या विशाल खिडकीत निळा-जांभळा मयुर पिसारा फुलवून बासरी ऐकत होता. पहाटेच्या गारव्याने थरथरणारा फुललेला पिसारा ! कृष्ण डोळे मिटून बासरी वाजवण्यात मग्न होता. आज त्याचे सूर काही वेगळेच होते.
"अनुज!"
कृष्णाने डोळे उघडत बासरी बाजूला केली.
"दाऊ? काय झालं?" बलरामाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत कृष्णाने विचारलं.
"मला हे पटत नाही युवराज!"
"का?"
"हे एका योद्ध्याचे काम नव्हे."
"ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले.
"युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन."
युगांतर - आरंभ अंताचा!
भाग ३७