प्रेम

प्रेमात पडला Electronics Engineer

Submitted by जग्या on 4 September, 2010 - 11:53

प्रेमाचा Doppler Radaar माझा
ठेवतो मी नेहमी Activate
कोण जाणो करून जाऊ शकते
कधीही नकळत ‘ती’ Captivate

रोजच वाटते मिळतोय signal
पण असते नुसतीच खरखर
channel ‘Fine-tune’ करेपर्यंत
निघून जाते ‘ती’ भरभर

Network coverage वाढावे म्हणून
modulate करतो मी Bandwidth Range
Resonance मात्र होत नाही कारण
माझी wavelength च आहे strange

निराश झालो कारण झाला Jam
माझ्या प्रेमाचा band pass filter
तेवढ्यात screen वर दिसली sine wave
आले असेल कहो ‘ तिकडून ‘ उत्तर ??

वाटले मलाही ‘Koi Mil Gaya ‘
अन ‘प्रेमाची Frequency’ मिळाली
कळले नंतर तो होता Interference

शब्दखुणा: 

प्रेमाची बँक

Submitted by पाषाणभेद on 27 August, 2010 - 02:42

प्रेमाची बँक

तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का?
माझे अकाउंट उघडतेस का?
माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ||

खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला
प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला
इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का?
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१||

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग
सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग
त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रेम