पुणे - कुरवपूर सायकल यात्रा संपन्न झाली होती. २६ जानेवारी रोजी अतुलजी सुबंध आणि प्रफुल्ल जी डांगे अभिनंदन करण्यासाठी घरी आले होते. चहा पिताना मोरगाव निवास करण्यासारखी सायकल यात्रा करावी असं प्रफुल्लजींनी सुचवलं.
१२-१३ फेब्रुवारी चा विकेंड निवडला गेला. शनिवारी अतुलजींचा हाफ डे ऑफिस. मग संध्याकाळी निघायचं, रात्री चा मुक्काम, सकाळी दर्शन घेऊन परतीची वाट धरायची अस ठरलं. या वेळी श्रेयस सिद्धपाठकी पण येणार होते. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच सायकल स्वारी होणार होती. प्रफुल्ल जींचा कोकण यात्रेचा अनुभव, अतुलजींचा पंढरपूर यात्रेचा अनुभव गाठीशी होता.
पाळीव प्राण्यांच्या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण तिथे रागवल्याने नवीन धागा.
अ) नेहमीपेक्षा वेगळे प्राणी पाळण्याची आवड असलेल्यांना येणारी समस्या म्हणजे सुटीत बाहेर फिरायला जाताना काय करावे ? मी एक पाणघोडा आणि गेंडा पाळण्याच्या विचारात आहे. सुटीत आम्ही हिमालयात फिरायला जातो. आमचा पाळीव प्राणी सोबत न्यायचा झाल्यास काय करावे लागेल ? तसेच हॉटेल, रिसॉर्ट, बंगला यापैकी त्याची सोबत राहण्याची सोय कशी होईल ? प्रेक्षणीय स्थळे पहायला जाताना त्याला सोबत कसे न्यावे कि त्या ठिकाणी त्याच्यासाठी विरंगुळा केंद्रे असतात ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली तीच लगबगीने. कुणीतरी दार ठोठावत होते. कुणीतरी उघडले, कुणीतरी सांगितले सब को तयार होने के लिये बोला है, ओर चाय पिने के लीये आ जाव. कुणीतरी म्हणाले, ठीक है आते है. परत दार लावल्याचा आवाज. पण त्यातल्या चाय शब्दाने माझी झोप उडाली. एरवी मी तसा कॉफी प्रेमी पण बाहेर गेल्यावर विशेषत ट्रेकला तर मग चहा ( त्याचे कारण ट्रेकवर कधीच चांगली कॉफी मिळत नाही हेही आहे). मोठ्या अनिच्छेने ते उबदार पांघरूण दूर करून उठलो, आणि रुमबाहेर आलो तर एकदम शिरशीरी आली. चांगलाच गारठा होता बाहेर. तसाच हाताची घडी करून कँटीन कडे गेलो, तिथे एकजण गरमागरम चहा स्टीलच्या कपात ओतून देत होता.
गिलमन पॉइंटला ९:३० ला फक्त मीच पुढे उहूरुपर्यंत जाऊया म्हणून उत्साहात होते, बाजूला रिम दिसत होते आणि खुणावत पण होते. निलाद्री आधी उत्साहात दिसला पण नंतर नको म्हणाला. परांजप्यांनी अख्खा ट्रेक गाऊटमधला ग सुद्धा उच्चारला नव्हता, पण तरी ते ही नको म्हणाले. शक्य असते तर मी त्यांना "You too Brutus ?" म्हटले असते. या क्षणीसुद्धा डेविड आणि वॉलेस यांची पुढच्या वेळेबद्दल आणि अंतराबद्दल एकवाक्यता नव्हती. तरी फार तर १ दीड तास अजून . माध्यान्हीच्या आधीच तिथे पोहोचले असते. परत यायला २ तास, किबो हट पर्यंत उतरायला २-३ तास. पुढे होरोम्बोला १२००० फुटांपर्यंत उतरेपर्यंत अजून ३ तास.
पोले पोले एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली. आगगाडीच्या डब्यांसारखे एकाच दिशेत एकाच वेगाने सर्वजण चालत होतो. डेविड पुढे मागे परांजपे, मग निलाद्री, मग उपाध्ये फॅमिली मग DS , मी आणि वाकणकर. एक गाईड मागे, दुसरे २ आणि काही पोर्टर्स आजूबाजूला. ते सतत जवळ येऊन कसं वाटतंय हे विचारत होते, पाण्याची नळी बॅगबाहेर काढणे, poncho घालणे वगैरे मदत करत होते. डेव्हिडने भयंकर slow pace set केला. रात्रभर चढायचे आहे, श्वास लागू नये, शरीर हळूहळू तयार व्हावे, आणि त्यांना सगळा अनुभव आहे हे लक्षात घेता ते ठीकच वाटले. चालू लागलो आणि मी सर्वप्रथम काय केले असेल तर तीनताल डोक्यात ठेवून त्या तालात श्वासोश्वास चालू केला.
मावेन्झी हटला अखेर एकदाचा सूर्योदय झाला, तो अपेक्षेइतका स्वच्छ नसला तरी होता तितकाही हवाहवासा वाटत होता. फ्लॉरिडात सूर्यनारायण आमच्यावर जी अखंड कृपा करीत असतो त्याची व घराची एकदा आठवण झालीच. एकदाचे ते तळे बघायला मिळाले, छानच होते. आमच्या राहण्याच्या जागेच्या आसपास, टेकड्या होत्या त्यावर गेले. gloves न घालता बाहेर गेल्याने हातांची लाकडे व्हायची बाकी राहिली. वरून खालचे खोरे मात्र खल्लास दिसत होते. इथे cable car करावी असा Chinese investment चा प्रस्ताव आहे. ही कल्पना तिथल्या पोर्टर्सना बहुदा मान्य नाही.
नमस्कार - मदत हवी आहे...
पुण्याहून रात्री 8 वाजता दिल्ली फ्लाईट आहे आणि दिल्लीहून रात्री 3 ला अमेरिकेला... या कनेक्टिंग फ्लाईट्स आहेत...
RTpcr टेस्ट दिल्ली च्या फ्लाईट च्या 24 तास आधी लागेल कि पुण्याच्या 24 तास आधी?
Rtpcr टेस्ट ला 12 तास लागेल म्हणतायत पुण्यातील एक लॅब- यापेक्षा लवकर कुठे मिळेल..
पुणे एअरपोर्ट वर टेस्ट करून मिळते का?
दिल्ली एयरपोर्ट ला जाऊन टेस्ट करता येईल का?
किकेलेवाची रात्र जितकी रम्य तितकीच सकाळही प्रसन्न. मोठा canvas भवताली दिसत होता, सावरकरांना असाच कोणतातरी सूर्योदय बघताना 'दिक क्षितिजांचा दैदिप्यरथ तुझा सुटता ' सुचली असणार. मग त्या कवितेचे मनातल्या मनात पारायण झाले. पण पुढे जायचेच होते. सकाळचा ब्रेकफास्ट आणि बाकी तयारी नेहमीप्रमाणे झाली. ऊन होते त्यामुळे सुरुवातीला तरी काही वेळ हॅट लागणार होती आणि ती सापडत नव्हती. कपडे उबदार रहावेत म्हणून रात्री sleeping बॅग मध्ये घालून झोपत होतो. हॅट तिथेच राहिली असणार असे वाटले. छान पॅक केलेली sleeping बॅग उघडली, अपेक्षेप्रमाणे हॅट सापडली. रागारागात पुन्हा sleeping bag जास्तच चांगली पॅक झाली.
या hike मधली सगळ्यांत उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळ सुंदर असायची. माझ्यापाशी तोडी, भैरव किंवा ललत चे रेकॉर्डिंग नाही किंबहुना जाणीवपूर्वक आपण रेकॉर्डेड गाणी आणलीच नाहीत याबद्दल त्या सकाळी जरासे वाईट वाटायचे. पराग वाकणकरांनी गाणी आणली होती पण बहुदा पहिल्याच दिवशी त्यांचा फोन आणि player बॅगमध्ये उघड्या कप्यात राहून पावसात स्वाहा झाले होते, त्यामुळे तो मार्गही बंद होता. फोन कामातून जाऊनही गृहस्थ calm and composed आहे हे बघून थक्क झाले. माझे, इतरांचा फारसा विचार न करता स्वतःच्याच वेड्यावाकड्या आवाजात गाण्याचे प्रयत्न चालू होते आणि जास्त करून स्मरणरंजन.
सिम्बा कॅम्पची सकाळ सुंदर होती, सूर्योदयालाच उठले. DS ची लवकरात लवकर बाहेर जाऊन पहिला चहा घेण्याची इच्छा असायची आणि मला सगळं यावरून एकदम tent मधून बाहेर पडायला आवडायचे, त्यामुळे खूपच सोयीचे झाले. इथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही पण इंका trail च्या मानाने आमच्या बरोबरचे portable टॉयलेट्स बरेच चांगले होते. इतक्या उंचीवर, इतक्या गैरसोयीच्या ठिकाणीही गैरसोय झाली नाही. सकाळी लख्ख ऊन पडले होते, किलीचे शिखरही स्वच्छ दिवस होते. अर्थात फोटो काढले गेलेच पण त्याआधी प्रत्येकाने सगळे कपडे, shoes, socks जे दिसेल ते उन्हात वाळवायला घातले होते. आदल्या रात्री पाऊस आणि गारठ्याने ओलसर झालेले.