सुट्टीत फिरायला जाताना गेंडा विमानातून कसा न्यावा ?

Submitted by शांत प्राणी on 7 February, 2022 - 11:01

पाळीव प्राण्यांच्या धाग्यावर हा प्रश्न विचारला होता पण तिथे रागवल्याने नवीन धागा.
अ) नेहमीपेक्षा वेगळे प्राणी पाळण्याची आवड असलेल्यांना येणारी समस्या म्हणजे सुटीत बाहेर फिरायला जाताना काय करावे ? मी एक पाणघोडा आणि गेंडा पाळण्याच्या विचारात आहे. सुटीत आम्ही हिमालयात फिरायला जातो. आमचा पाळीव प्राणी सोबत न्यायचा झाल्यास काय करावे लागेल ? तसेच हॉटेल, रिसॉर्ट, बंगला यापैकी त्याची सोबत राहण्याची सोय कशी होईल ? प्रेक्षणीय स्थळे पहायला जाताना त्याला सोबत कसे न्यावे कि त्या ठिकाणी त्याच्यासाठी विरंगुळा केंद्रे असतात ?
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

ब ) पाणघोडा सातव्या मजल्यावर पाळताना काय काळजी घ्यावी लागेल ? त्याचे काय काय कार्यक्रम असतात ? त्यासाठी आपण काय केले पाहीजे ?
अनुभवींनी कृपया मार्गदर्शन करावे. अननुभवींचे विशेष स्वागत.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रान्सफिगरेशन स्पेल्स नीट शिकून घ्या. वॅंड चांगल्या कंडीशन मध्ये ठेवा. मग गेंड्याला कुत्र्याच्या छोट्या पिल्लामध्ये ट्रान्सफिगर करा. सीट खाली जाईल एवढ्या बास्केटमध्ये ठेवून घेऊन जा. विमानातून उतरल्यावर परत गेंड्यात ट्रान्सफिगर करा.

आमचा जब्या सुद्धा कधीतरी माझ्यासोबत ऑफिसला यायचेय असा हट्ट करायचा. जब्या आमचा पाणघोडा. राणीबागेत लेकीने पाणघोडा पाहिला आणि आवडलाच. मग तिचा हट्ट पुरवायला घेतले एक पाणघोड्याचे पिल्लू. घरीच वाढवून त्याला मोठे केले. त्यामुळे लळाही लागला. लळ्यातून असे ऑफिसला यायचे हट्ट सुरू झाले. मग न्यायचो त्याला ट्रेनच्या मालडब्यातून. दर आठवड्यात दोनदा तरी हट्ट करायचा. म्हणून मग पासच काढला होता त्याचा. लगेज म्हणून चार्ज लावायचे. म्हणून रोजच्या रोज तिकीट परवडायचे नाही. अर्थात एक फायदाही होता. स्टेशन ते ऑफिस रिक्षा करावी लागायची नाही. जब्यावरच स्वार व्हायचो.
पण एक बरे होते. तेव्हा आम्ही मुंबईलाच राहत असल्याने उलट्या दिशेने ट्रेन रिकामीच मिळायची. एकदोन मच्छीवाले असायचे डब्यात. ते स्वत:च जब्याला बघून खाली ऊतरायचे.
आणि हो, आम्ही दहाव्या मजल्यावर राहायचो. लिफ्ट मोठी होती ऐसपैस. तरी जब्या मोठा होऊ लागला आणि अडकू लागला तसे मग बिल्डींगच्या बाहेरच्या बाजूने एक लिफ्ट बसवून घेतली. तिचा दरवाजा थेट आमच्या खिडकीत ऊघडायचा. आवक जावक सुलभ व्हावी म्हणून मोठी फ्रेंच विंडो केली. जब्या तिथूनच ये जा करू लागला. बटणं कशी दाबायचे हे त्याला शिकवल्याने त्याची तो लिफ्ट वापरू लागला. मी सिविल ईंजिनीअरच असल्याने माझ्यासाठी अशी रचनात्मक बांधकामे म्हणजे रोजचे काम होते.
जब्याला कधी विमानातून न्यायचा प्रसंग आला नाही त्यामुळे त्याची कल्पना नाही. पण सातव्या मजल्यावर पाणघोडा नेण्यात तुम्हाला काय अडचणी आहेत हे समजले तर अनुभवातून शिकलेलो उपाय सांगू शकतो.
आपले भले ईतर धाग्यावर सतरा वाद असतील. पण ईथे विषय पाणघोड्याचा आहे. मनाच्या जवळचा हळवा कोपरा आहे. अर्ध्या रात्री उठवलेत तरी जब्यावर स्वार होत धावून येईन मदतीला. फक्त एक हाक मारून बघा. राणीच्या बागेशेजारी बालपण गेलेय. जंगली जनावरांच्या भावना माझ्यापेक्षा जास्त कोण समजणार _/\_

गेंड्याची आरटीपीसीआर टेस्ट 24 तास आधी करावी लागते. पाणघोडा पाण्यात घालून नेणार असाल तर टेस्ट ची गरज नाही.
मात्र पासपोर्ट नवा असेल तर pio कार्डचेही ( पाणघोडा ऑफ इंडियन ओरिजिन) नूतनीकरण करून घ्यायला लागेल का ते एकदा वॉशिंग्टन एम्बासी ला फोन करून विचारून घ्या.

त्या एस्कोबारने (नार्कोस वाला) कोलंबियात नेलेले हिप्पो आता खुप मोठा प्रॉब्लेम झाले आहेत. आता तुम्हाला अजून गेंडा कुठे घेऊन जायचा आहे ? जिथे आहे तिथे राहू द्या त्याला.

https://en.wikipedia.org/wiki/Hippopotamus_in_Colombia

मोठ्या उत्साहात धागा उघडला पण . .
अनुभवींनी कृपया मार्गदर्शन करावे.
पण प्रतिसादात ते कमीच दिसले.
गेंडा वगैरे तुम्ही पाळलात हेच खूप अप्रुप आहे. वनखाते किंवा प्राणीमित्र संघटनाचा मोर्चा येतो का घराकडे? प्रथम गेंडा पाळणे - काळजी आणि नियोजन यावर एक धागा झालाच पाहिजे.
अमेरिकेत शक्य असणार. कारण तिकडे जागा भरपूर आहे असं ऐकतो/वाचतो. आणि स्वातंत्र्य फार आहे. म्हणजे की तसा पुतळा कुठेतरी लावला आहे. फ्रान्सने ती अडचण दिलेली.

तर एकूण काय गंमत आहे. एका माणसाने अमेरिकेत उंट पाळलेले हौसेने पण तिकडे 'घटस्फोटाची कारणे' यामध्ये पार्टनरने उंट पाळणे हेसुद्धा येते. आमच्याकडे 'ट्राफिक फार' हे एक नवीन कारण शोधले गेले इहे त्याचा डेटा मुन्शीपालटी गोळा करत आहे.

तर मुद्दा असा की विमान कंपन्या आता कोणत्याही सोयी देणाऱ्या निघत आहेत आणि शक्य आहे.

आम्ही सुट्टीला जाताना आमच्या पेटला बरोबर नेतो कारण तो डॉग हॉस्टेलमध्ये रहायला नकार देतो आणि रडतो. आपण मजा करायला गेल्यावर त्याला दुःखात सोडवत नाही म्हणुन सगळीकडे बरोबर असतो.
पण तुम्ही तर पाणघोडा खाण्यासाठी (संदर्भ - पाणघोड्याची कबाब आणि चटणी) सांभाळता मग त्याला का बरं बरोबर न्यायचं आहे? की काही लोक मॅगी पॅकेट्स बरोबर बाळगतात तसे तुम्ही stand by म्हणुन घरचाच असावा म्हणुन पाणघोडा नेता आहात? सहज आपली उत्सुकता.
बाकी हा पाणघोडा विशेष प्रेमाचा असेल तर न्याच बरोबर. होऊ दे खर्च.

उसमे क्या है उगीच बाफ काढायचे . विमान चार्टर करायचे. तुम्ही व पाघो दोघे फिरून या.

<<लोक मॅगी पॅकेट्स बरोबर बाळगतात तसे तुम्ही stand by म्हणुन घरचाच असावा म्हणुन पाणघोडा नेता आहात? >> Proud याची दाट शक्यता वाटतेय आता.

<< मी एक पाणघोडा आणि गेंडा पाळण्याच्या विचारात आहे. >>
गेंड्याला रोज वॉक वॉल्कला न्यावे लागते, म्हणून तुम्ही हिमालयात जाण्याऐवजी सपाट ठिकाणी जावे असे सुचवतो.

अरे ते वॉकचे वॉल्क करू नका. शांत माणूस माझे आयडी नाहीत.
आधीच ईन्बॉक्सात बरेच चौकशी झाल्यात त्यांच्या नावाने की हा तुझाच आयडी आहे का म्हणून... या धाग्यानंतर अजून दोन तीन मेसेज आले.. त्यात अजून अश्या पोस्ट टाकून संशयाचे वातावरण नको प्लीज _/_

सर्व सासरच्या मंडळींना विमानात घालून प्रवास करा.
शेवटी "सासुराल गेंडा full" आयहोयओय