कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे ठरवणारी मंडळी ह्युज हेफ्नरच्या 'पे-रोल' वर असावीत असा माझा मराठी संशय आहे. चवीला बर्यापैकी असणार्या या बहुतांश पेयांची नावे मात्र भलतीच अब्रह्मण्यम असतात. 'से.. ऑन द बीच' काय (गरजूंनी गाळलेल्या जागा मनात भराव्यात), 'बे ऑफ पॅशन' काय किंवा 'क्लायमॅक्स' काय, सगळाच विचित्र मामला. चार चौघांत मोठ्याने उच्चारायचीसुद्धा लाज वाटावी अशी नावे देऊन काय साध्य होते ते त्यांनाच माहीत. बरं भारी हॉटेलात (सॉरी रेस्तराँमध्ये) ही पेयं पिऊन फक्त खिशाला चाट बसते आणि नावातून सुचवलेली अनुभूती अजिबात मिळत नाही हे माहित असतानाही अशी नावे ठेवण्याचा अट्टाहास कळत नाही.
सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते..
माझं लहान पण भरपुर मजेत गेलयं. खास करुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या
जसे परीक्षेचे वेध लागयचे तसेच आजोळी जायचे पण
परीक्षा झाली की दुसरे दिवशी आजोळ. जाताना बाबांना एकटं सोडुन जाताना वाईट वाटायचं.
जायला पुर्ण एक रात्र लागायची पण मजा वाटायची.
खुप सारी मामे आणि मावस भावंडं जमलेली असायची, धमाल एकदम.
उन्हाळ्याचा कार्यक्रम पुर्ण ठरलेला. उशीरा उठायचं, चहा/दुधासोबत ब्रेड खायचा. खालच्या आणि वरच्या स्लाईससाठी खुप भांडणं व्हायची, मग आळीपाळीने तो ब्रेड सगळ्यांना मिळायचा.