समर कुलर - कैरी काकडीचे सरबत
Submitted by सावली on 10 April, 2014 - 03:39
कॉकटेल्स्/मॉकटेल्सची नावे ठरवणारी मंडळी ह्युज हेफ्नरच्या 'पे-रोल' वर असावीत असा माझा मराठी संशय आहे. चवीला बर्यापैकी असणार्या या बहुतांश पेयांची नावे मात्र भलतीच अब्रह्मण्यम असतात. 'से.. ऑन द बीच' काय (गरजूंनी गाळलेल्या जागा मनात भराव्यात), 'बे ऑफ पॅशन' काय किंवा 'क्लायमॅक्स' काय, सगळाच विचित्र मामला. चार चौघांत मोठ्याने उच्चारायचीसुद्धा लाज वाटावी अशी नावे देऊन काय साध्य होते ते त्यांनाच माहीत. बरं भारी हॉटेलात (सॉरी रेस्तराँमध्ये) ही पेयं पिऊन फक्त खिशाला चाट बसते आणि नावातून सुचवलेली अनुभूती अजिबात मिळत नाही हे माहित असतानाही अशी नावे ठेवण्याचा अट्टाहास कळत नाही.