समर कुलर - कैरी काकडीचे सरबत

Submitted by सावली on 10 April, 2014 - 03:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटी कैरी - १
काकडी - अर्धी
अर्धा टिस्पुन - धणे जीरे पावडर
गुळ - साधारण अर्धी वाटी / कैरीच्या प्रमाणात
सैंधव - चवीपुरते
पुदिना पाने - दोन तीन ( ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

कैरी बारिक चिरुन अथवा किसुन घ्या.
काकडी बारिक चिरुन घ्या
गुळ ( पावडर असेल तर तसाच नाहीतर किसुन घ्या).

कैरी, काकडी, गुळ, सैंधव, धणे जीरे पावडर, पुदिना पाने हे सर्व मिक्सरमधे घालुन अर्धी वाटी साधे पाणी घाला ( आधीच जास्त घातल्यास सगळे नीट वाटले जात नाही ) अगदी बारिक वाटुन घ्या. गुळही विरघळला पाहीजे ( चटणीसारखी पेस्ट)
गोडाचे प्रमाण बघुन हवे असल्यास अजुन गुळ घालुन आणि मिक्सरमधुन फिरवा. ( जरा जास्त गोड असु द्यावे, नंतर पाणी घालायचे आहे. )
दीड ते दोन ग्लास / ( चवीप्रमाणे हवे तसे ) पाणी घालुन पुन्हा एकदा मिक्सरमधुन फिरवा.

उन्हातुन आल्यावर थंडगार सरबत प्यायला मजा येते.

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन ग्लास
अधिक टिपा: 

- मिक्सरमधुन वाटताना आधीच जास्त पाणी घालु नका.
- पहिल्यांदा अर्धीवाटी पाणी साधे / कोमट घाला म्हणजे गुळ विरघळेल.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी छाने पण सरबातात ते काकडी कैरी ची पेस्ट अशी जाड जाड तोंडात येणार नाहीत???? प्लेन नसणार ते सरब्त टेक्स्चर ला???

प्लेन नसणार ते सरब्त टेक्स्चर ला??? >> नाही. अगदी प्लेन नाही बनत. अगदीच आवडले नाही तर गाळुन घेता येईल. पण मला तसेच प्यायला आवडते.

घरी केलेल्या पन्ह्यासारखे साधारण, पण काकडी असल्याने थोडे सरबरीत.

नाही मारली जात. काकडीची चव येते. अगदीच हवी असल्यास अख्खी काकडी टाकुन बघ. पुढच्या वेळेस करताना मी पण अख्खी काकडी घालुन करुन बघते

पण कैरी गुळापुढे काकडीची चव मारली नाही का जात?>>>>>>>>>>. मला ही हेच विचारायच आहे.....किंवा काकडी पुदिना च कॉम्बो + कैरी गुळ या मधे थोडी गडबड नाही का होत चवीत.....आणि गुळ नसेल घालायचा तर साखर चालेल...त्याने चव बदलेल ....... सर्व आहे घरात ....करुनच बघायला हव......

अनिश्का, प्रयोग करुन बघ Happy
पन्हं करायच्या आळसातुन या रेसिपीचा जन्म झाला आहे Wink त्यात एकदा अर्धी कापलेली काकडी ढकलली आणि छान लागली. पुन्हा केल्यावर सुद्धा आवडली म्हणुन इथे दिली. साखरपण चालेलच बहुधा, करुन बघ.