"खरं सांगायचं तर..."-एक जबरदस्त रहस्य!
(काल आपलीमराठी वर "खरं सांगायचं तर.." हे नाटक बघितलं आणि जे वाटलं ते इथे सांगाय्चा प्रयत्न.
या आधी जर या नाटकावर काही लिहिलं गेलं असेल तर हे लेखन कुठे हलवू ते सांगावं).
नितिन सावरकर हा एक साधा, सरळ माणूस काही कारणामुळे एका स्त्रीच्या खुनाच्या खटल्यात अडकतो.
सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध असतात. 'होपलेस चेहर्यांची अखेरची आशा' असलेल्या अॅड. धनंजय कर्णिक (विक्रम गोखले) यांची मदत मिळावी म्हणून तो त्यांच्या ऑफिसमधे येतो. आपली सगळी कहाणी सांगतो. ती स्त्री- मिस शिरिन वाडिया हिच्याशी आपली ओळख कशी झाली, मैत्री कशी झाली वगैरे सगळं प्रामाणिकपणे सांगतो.