सर्व्हे रिपोर्ट: विभाग - प्राथमिक माहिती

Submitted by संयोजक on 21 March, 2010 - 02:48

प्राथमिक माहिती:
कुठल्याही सर्वेक्षणाचा पाया म्हणजे प्राथमिक माहिती. या सदरात ११ अनिवार्य प्रश्न विचारले होते. या प्राथमिक माहितीच्या आधारे आपल्या प्रतिसाद देणार्‍या मैत्रिणींचे रेखाटन करता आले.

  • वय
    ६६% स्त्रिया या २१-४० या वयोगटात आहेत.
    १४% स्त्रिया या ४१-५० या वयोगटात येतात.
    केवळ १% स्त्रियांनी ६१ वर्ष पार केली आहेत. त्या परदेशात स्थित आहेत.

    agegroup.jpg

  • शिक्षण/पदवी:
    Educationlevel.jpg
    एकूण मैत्रिणींपैकी १०% पी.एच्.डी आहेत. पदवीधर आणि द्विपदवीधर प्रतिसादाचे प्रमाण जवळजवळ सारखेच म्हणता येईल असे आहे.

    २% स्त्रिया (एकूण ३) पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या असून त्यापैकी एक जण अभारतीय आहे.

  • पदवी आणि शाखा:

    Graduation.jpg

  • सध्याची नोकरीस्थिती:

    Employment Status.JPG
  • सध्याचे राहण्याचे ठिकाण:
    ३९% स्त्रिया सध्या भारतात आहेत (पुणे, मुंबई, नाशिक, नगर, वापी, सिंधुदुर्ग, हैदराबाद, रत्नागिरी. या प्रश्नावलीला प्रतिसाद देणार्‍या स्त्रियांपैकी सर्वात जास्त स्त्रिया सध्या पुण्यामुंबईत स्थित आहेत. )
    ६१% स्त्रिया सध्या परदेशात स्थित आहेत. (अमेरिका, जर्मनी, दुबई, ऑस्ट्रेलिया, यु.ए.ई, युके, कोरिया)

    वयाची ०-२० वर्षे ९०% स्त्रिया भारतात होत्या. (पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, वाई, औरंगाबाद, धुळे, नागपूर, नेवासा, रत्नागिरी, कलकत्ता, रुर्की, श्रीरामपूर, चेन्नई, विशाखापट्टणम, नाशिक, कराड).

    विचार करण्याजोगी गोष्ट म्हणजे यापैकी कोणीही स्त्रिया सध्या कलकत्ता, चेन्नई, रुर्की, श्रीरामपूर, सातारा, सांगली, वाई, औरंगाबाद, विशाखापट्टणम, नेवासा, धुळे, कराड येथे स्थित नाहीत.
    ग्रामीण भारतातील महिला यात जवळजवळ नाहीतच असे निश्चितपणे म्हणता येईल.

    एकंदरीत उत्तरं पाहता मूळ परदेशी नागरिक स्त्रियांची मतभिन्नता तपासून पहायचा मानस होता, पण थेट संबंध प्रस्थापित होण्याएवढी उत्तरं नाहीत. तरीही काही प्रश्नांवर त्याचा पगडा जरुर जाणवतो.

  • आर्थिक स्थिती:

    सर्वच स्त्रियांनी आर्थिक स्थिती मध्यमवर्गीय (५१%), सुखवस्तू (४९%) नोंदली आहे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कोणीही इतर पर्याय नोंदवले नाही. प्रश्नावलीला आलेल्या एकंदरीत उत्तरांतील विचारात हा एक महत्त्वाचा घटक आहे.

    सध्या देशात आणि परदेशात असलेल्या स्त्रियांमध्येही त्यांच्या मते आर्थिक स्थितीचा फारसा फरक नाही.
    मध्यमवर्गीय वा सुखवस्तु यात आपण वार्षिक पगाराचे निश्चित आकडे विचारले नव्हते, त्यामुळे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांच्या मते त्या स्वतः मध्यमवर्गीय वा सुखवस्तु गटात मोडतात एवढेच आपण निर्विवाद म्हणु शकतो.

  • अपत्य:
    सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांपैकी ६१% स्त्रियांना अपत्य आहे. किमान १ (३९%), २ अपत्य (२०%) कमाल ३ (२%). ३ अपत्य असणार्‍यांपैकी १ स्त्री परदेशी आहे.

    अपत्यांचे वय हा आपल्या प्रश्नावलीचा भाग नव्हता. कितव्या वर्षी अपत्यप्राप्ती झाली हाही प्रश्न आपण विचारात घेतला नाही तरीही २०-२५ या वयोगटातील २ स्त्रियां सध्या गर्भार आहेत आणि दोघीही मूळ भारतीय वंशाच्या, पण सध्या भारतबाहेर वास्तव्य करुन आहेत.

  • कुटुंबस्थिती:

    ७७% स्त्रिया सध्या संयुक्त कुटंबात रहात नाहीत. पूर्वी रहात असल्यास तो प्रश्न आपल्या प्रश्नावलीचा भाग नव्हता. त्या संदर्भातील काही आडाखे बांधता येणार नाहीत.

    १२% स्त्रिया सासुसासरेआईवडिलांसमवेत राहतात. यापैकी विवाहित स्त्रियांमधील कोणीही सध्या आईवडिलांबरोबर रहात नाहीत. फक्त एक स्त्री (गोपनियतेसाठी नातेस्थिती राखीव ठेवली आहे) आईसमवेत राहते. एकच परदेशी (भारतीय वंशातील नसलेली) स्त्री संयुक्त कुटुंबात रहाते.

    ७% स्त्रिया संपूर्ण संयुक्त कुटुंबात रहातात. आजेसासुसासरे/दीर/जाऊ/पुतणे/सासु/सासरे/भाऊ/वहिनी/भाचा यांचा या कुटुंबात समावेश आहे. परदेशात संपूर्ण संयुक्त कुटुंबात रहाणार्‍या, पण मूळ भारतीय वंशाची, मराठी भाषिक नसलेल्या एकाच स्त्रीचा यात समावेश आहे.

    स्वतःला धरून कुटुंबातील किमान सदस्य संख्या १ आणि कमाल ९ आहे.

  • वंश/देश/धर्म/जात/पोटजात/भाषा:

    एकुण १२२ स्त्रियांनी प्रश्नावली भरली. त्यातील ११२ स्त्रिया भारतीय वंशाच्या आहेत तर १० अभारतीय, प्रामुख्याने ख्रिश्चन, सध्या अमेरिकन किंवा White Caucasian (यात एक अर्धी White अर्धी भारतीय (म्हणजे अर्धी भारतीय) वंशाच्या आहेत.

    भारतीय स्त्रियांमध्ये ६ जणींनी धर्म /जात नमूद केली नाही (त्यांची त्याविषयीची मतं ठाम असल्यामुळे, गरज नसल्यामुळे, मानत नसल्यामुळे इ). उरलेल्या १०६ पैकी ४ जैन स्त्रिया सोडल्या तर बाकी सर्व महिला हिंदू आहेत व त्यातही बहुतांशी ब्राह्मण आहेत. बहुतेक सर्वच स्त्रिया एकाच जाती किंवा धर्माच्या असल्याने जाती/ धर्माप्रमाणे विचारपद्धती बदलते/ बदलू शकते हे गृहितक तपासता आले नाही व त्यामुळे विश्लेषण करताना धर्म/जात हा घटक विचारात घेता आला नाही.

    हे चित्र तुम्हाला दिलासादायक वाटते का? याचा आर्थिक स्थितीची काही महत्त्वाचा संबंध असू शकेल का हे काही प्रश्न आम्ही वाचक म्हणून तुमच्यावर सोपवतो.

    मातृभाषा: प्रामुख्याने मराठी, अपवादात्मक :- पोलिश, लिथुआनियन, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड, बंगाली, उडिया.

  • नातेस्थिती:

    सर्वेक्षणामध्ये भाग घेतलेल्यांपैकी मैत्रिणींची नातेस्थिती खालीलप्रमाणे:

    natestiti.jpg

  • लैंगिकता
    सर्व स्त्रियांनी भिन्नलिंगी हा पर्याय निवडला आहे.


stline2.gifनिष्कर्ष

या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्या स्त्रियांपैकी बहुतांश स्त्रिया प्रामुख्याने मराठी भाषिक, सध्या संयुक्त कुटुंबात रहात नसलेल्या, २१-४० या वयोगटातील, मूळ भारतीय वंशाच्या त्यातही प्रामुख्याने हिंदू ब्राह्मण, परदेशात सध्या वास्तव्य करणार्‍या, देशात बहुतांशी पुण्यामुंबईत वास्तव्य करणार्‍या, पदवीधर आणि द्विपदवीधर, पूर्णवेळ नोकरी करणार्‍या, बहुतांशी विवाहित आणि किमान एक आणि कमाल तीन मुलं असणार्‍या आहेत.

एक वाचक अथवा/आणि प्रतिसाद देणार्‍या म्हणून यावर आपली मतं जाणून घ्यायला आम्हाला जरुर आवडेल.

थोडक्यात हा सर्व्हे शहरी,उच्चशिक्षित,उच्चवर्णिय,मध्यम/उच्च-मध्यमवर्गिय स्त्रियांबद्द्ल आहे,बरोबर का? हिंदू ब्राह्मण सोडून इतर जाती धर्माच्या किती स्त्रिया या सर्व्हेचा भाग होत्या?

नाही आगाऊ. सर्व्हे अशाच स्त्रिया निवडून केला नव्हता.
सर्व्हेतील स्त्रियांची अशी प्रोफाईल आहे असं म्हणता येईल.

मलाही तसे अजिबात म्हणायचे नाहीए,सर्वेचे आकडे वाचून मी केलेले हे जनरलायझेशन आहे,ते कितपत बरोबर आहे एवढाच माझा प्रश्न होता.

खूप तपशीलवार माहीती.
स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबतेचा आलेख पाहून अतिशय समाधान वाटले... Happy
फक्त शिक्षण/ पदवी ची माहीती ४०% स्त्रियांनी स्वत:जवळ राखून का ठेवलिये ते
नाही समजलं, अर्थात त्याने फार फरक पडत नाहिये कारण आर्थिक स्वावलंबतेचा
आलेख बरंच काही सांगून जातो. Happy

आगाऊ, असे म्हणण्यापेक्षा, असे म्हणता येईल का? की "आधुनिक" इन्टरनेटचे माध्यमातुन घेतलेल्या या सर्व्हेमधे सामिल होणे ज्यान्ना शक्य झाले त्या स्त्रीया बहुतान्शी हिन्दू-ब्राह्मण होत्या?
असो.
>>> हे चित्र तुम्हाला दिलासादायक वाटते का? याचा आर्थिक स्थितीची काही महत्त्वाचा संबंध असू शकेल का हे काही प्रश्न आम्ही वाचक म्हणून तुमच्यावर सोपवतो. <<<<

यात कशाबद्दल दिलासा वाटून घ्यावा हे उमगले नाही! Happy
मूळात हा सर्व्हे घेताना जे माध्यम वापरले इन्टरनेटचे, ते माध्यम वापरु शकणार्‍या बर्‍यापैकी शिक्षित असणार, यात शन्काच नको, तसेच हे माध्यम वापरण्याकरता घरी अथवा दारी तशी सोय असणे हे देखिल बर्‍यापैकी असलेल्या आर्थिक स्थितीचेच द्योतक असल्याने, वरील आकडेवारीतून, " बघा आजकालच्या स्त्रीया कशा शिक्षित-उच्चशिक्षित आहेत वा बघा आर्थिक दृष्ट्या कशा सम्पन्नावस्थेत आहेत" असले नि:ष्कर्ष काढता येणार नाहीत असे मला वाटते Happy

मात्र, सुशिक्षित्/सधन सामाजिक वर्गातील ज्या स्त्रीयान्चा हा सर्व्हे घेतला गेला आहे, त्यातिल "अपत्य व कुटुम्बस्थिती" हे दोन मुद्दे मला जास्त लक्षणीय वाटतात.
पैकी...>>>> सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांपैकी ६१% स्त्रियांना अपत्य आहे. किमान १ (३९%), २ अपत्य (२०%) कमाल ३ (२%). ३ अपत्य असणार्‍यांपैकी १ स्त्री परदेशी आहे. <<<<<
६१% हा आकडा निश्चितच दिलासा जनक आहे.
उरलेल्या ३९% पैकी "अपत्य नकोच" म्हणून नसलेल्या किती, हे कळत नसल्याने त्याबाबत विचार करता येत नाहीये.

कुटुम्बस्थितीबाबत, शहरी जीवनातील अपरिहार्य अडचणीन्मुळे, आईवडील वा सासुसारर्‍यान्बरोबर रहाणे हे शक्य होतेच असे नाही, त्यामुळे याबाबतच्या आकडेवारीतून काही निष्कर्षापर्यन्त पोहोचणे अवघड आहे.
तसेच, पूर्णतः स्वतन्त्र एकट्याने रहाणार्‍या स्त्रीयान्ची माहिती यात दिसत नाही (विचारलेली नसावि).
एकतर आईवडील, वा नवरा वा नवरावसासुसासर्‍यान्बरोबर वा एकत्रित कुटुम्बात रहातानाचीच आकडेवारी दिसते आहे. हा एक महत्वाचा मुद्दा म्हणा वा विषय म्हणा वा सामाजिक स्थिती/गरज म्हणा, दिसून येते आहे.

तूर्तास येवढेच! Happy

एकन्दरीत प्रेझेन्टेशन छान जमले आहे Happy कष्ट वाखाणण्यासारखे!
(आता असाच एक सर्व्हे मायबोलीकर पुरुषान्करता करा...... )

(आता असाच एक सर्व्हे मायबोलीकर पुरुषान्करता करा...... )>>> असा सर्वे जरुर व्हावा पण तोही 'संयुक्ता'ने करावा असं म्हणणं हा केवढा आळशीपणा ठरेल! त्यासाठी माबोनरांचा ग्रुप पाहिजे.

>>>> त्यासाठी माबोनरांचा ग्रुप पाहिजे.<<<<
मी ते "पेन्शनरान्चा" ग्रुप पाहिजे अस वाचल! Biggrin

बाकी तो सर्व्हे देखिल सयुक्तानीच करावा! Happy अस्ली किचकट कामे बायकान्नाच चान्गली जमतात
शिवाय पुरुषान्ना नेमके काय प्रश्न विचारले पाहिजेत हे देखिल त्याच चान्गल्या चिकित्सक पद्धतीने ठरवू शकतील!
(यात काहीही टोमणा वगैरे नाही, बर का! Wink )

>>>(आता असाच एक सर्व्हे मायबोलीकर पुरुषान्करता

पुरषांना एग्झाक्टली तेच प्रश्न विचारा, म्हणजे दृष्टिकोनातला फरक, मेन आर फ्रॉम मार्स, वगैरे काय ते कळेल.