तसे तर मला काडीचाही त्रास नाही
पण वाटते आयुष्य हा माझा घास नाही
उगाच चंद्र-सूर्याची ये-जा रोज बघत आहे
दिशांचा श्वासांना माझ्या कसलाच अदमास नाही
गात्र-गात्र एकवटेल ज्याच्या साधनेसाठी
गवसला कुठलाच असला अजून ध्यास नाही
माझ्या या अवस्थेचा उपहास करू तितका कमी
शंभर कड्या दाराला, छत माझ्या घरास नाही
उत्तरे मिळतील असे स्वतःस सांगत असतो
जिवंत आहे कारण, घेतला अजून गळफास नाही
- मंगेश विर्धे
(टीका प्रोत्साहित.)
ध्यास
वेळ तर पळत राही
वेदना छळत राही
जोडण्या बंध जाता
नातलग गळत राही
भोगता दु:ख थोडे
आत तो जळत राही
बांधता एक वाडा
दगड तो ढळत राही
जीव ज्या ध्यास लावी
गोष्ट ती मिळत राही
© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/()-31176/new/#new
अवचित भेट...
चित्त सैरभैर...
जाणीवां थेट....
भाव सैरवैर...
आस सोबतीची...
ग्लानी मनाची...
मैत्री विचाराची...
भाषा प्रेमाची...
पडझड कुटुंबाची...
घुसमट आत्माची...
धडपड नात्याची...
फरफट जीवाची...
बुद्धिबळाचा डाव...
खोलवर घाव...
काळाचा घाला..
प्रारब्ध झेला...
गृहीतकाचा तिढा...
कार्याची दखल...
समस्येचा वेढा...
प्रश्नाची उकल...
ध्यास नवा...
संघर्ष हवा...
इच्छेचा प्रकाश...
मोकळे आकाश...