गळफास
Submitted by मंगेश विर्धे on 10 June, 2020 - 15:43
तसे तर मला काडीचाही त्रास नाही
पण वाटते आयुष्य हा माझा घास नाही
उगाच चंद्र-सूर्याची ये-जा रोज बघत आहे
दिशांचा श्वासांना माझ्या कसलाच अदमास नाही
गात्र-गात्र एकवटेल ज्याच्या साधनेसाठी
गवसला कुठलाच असला अजून ध्यास नाही
माझ्या या अवस्थेचा उपहास करू तितका कमी
शंभर कड्या दाराला, छत माझ्या घरास नाही
उत्तरे मिळतील असे स्वतःस सांगत असतो
जिवंत आहे कारण, घेतला अजून गळफास नाही
- मंगेश विर्धे
(टीका प्रोत्साहित.)