कबुल केल्याप्रमाणे तनिष्कने काढलेली बाईक खुप महत्प्रयासाने शोधली. विशेष म्हणजे हे चित्र त्याने समोर बाईक नसतांना काढलय.... तनिष्कच्या या चित्रात मला भावलेली गोष्ट म्हणजे बाईक स्टँडवर लावलेली असतांना हँडल तिरपे होउन पुढच्या व्हीलचा जो आकार दिसतो ते तो हुबेहुब काढतो.... नुसते इमॅजिन करुन!
![Untitled-1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4652/Untitled-1.jpg)
तनिष्कने काढलेले चित्र!
-
![Image021.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u1030/Image021.jpg)
नावः अर्थव उपकारे[ओंकार]
वयः ८ वर्ष
![trees_0.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/trees_0.JPG)
एम्.एस्.ऑफिसच्या "पेंट" मध्ये केलेला उद्योग.
![IMG_0007.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5443/IMG_0007.JPG)
या ६ ऑगस्टला आमच्या घरी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशीर्वादाने कन्यारत्नाचे आगमन झाले.
'यावरून स्केच काढता येईल' या कलेक्शनमधे याचा मूळ फोटोग्राफ बरेच दिवस पडुन होता. जेंव्हा सौं नी पहिल्यांदा बातमी दिली तेंव्हा हे स्केच काढायला मुहुर्त लागला. आणि फेब्रुवारी मधे लग्नाच्या वाढदिवसाला चित्र भेट म्हणुन दिले.फोटोच्या शिर्षकाबद्दल माझा कयास पक्का होता, म्हणजे मी हेच शीर्षक मनात ठेवून काढले होते .पण तरीही ते प्रकाशित करण्यापुर्वी फायनल रिझल्ट कळणे महत्वाचे होते.