तनिष्कने चौथीत असतांना काढलेली मोटरसायकल

Submitted by मी_आर्या on 16 September, 2009 - 02:47

कबुल केल्याप्रमाणे तनिष्कने काढलेली बाईक खुप महत्प्रयासाने शोधली. विशेष म्हणजे हे चित्र त्याने समोर बाईक नसतांना काढलय.... तनिष्कच्या या चित्रात मला भावलेली गोष्ट म्हणजे बाईक स्टँडवर लावलेली असतांना हँडल तिरपे होउन पुढच्या व्हीलचा जो आकार दिसतो ते तो हुबेहुब काढतो.... नुसते इमॅजिन करुन!

Untitled-1.jpg

गुलमोहर: 

थँक्स सर्वांना! Happy

<<<< केवढं proportionate, ते ही समोर गाडी नसताना!!

हो मी exaggerate नाही करत्...पण त्याची निरिक्षणशक्ती जबरदस्त आहे!

कार्ब्युरेटर आणि इंजिनचे तपशील तर खासच.. मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे स्प्ल्रेन्डरच्या पुढच्या दिव्याचा आणि त्यावरच्या प्लास्टिकच्या भागाचा आकार पण उच्च दाखवलाय!

अरे वा.. फारच सुरेख !! न बघता काढलं म्हणजे विशेषच !!

अजून नवी चित्रं बघायला खूप आवडेल.

Brilliant-awe inspiring-simply mind blowing
मराठी राज्य कर्त्यानो मला माफ करा.या भावना अशाच उत्स्फूर्त याच भाषेत उफाळून आल्या

खुप छान वाटलं तुमच्या एन्करेजिंग प्रतिक्रिया वाचुन...तनिष्क तर खुप खुश आहे हे बघुन! त्याने काढलेल्या फाइटर प्लेनच्या अजुन डिजाइन्स, तोफा, रणगाडे आणी रॉकेटस ही टाकेल आता हळूहळू! Happy

अफाट ! जबरदस्त निरिक्षणशक्ती!! व रेषांवरचे नियंत्रण !!!
.............................................................................
भाग्य तुझे आई, तुझ्या सुखा नाही अंत
तुझ्या घरी जन्मला गं..... कलावंत! Happy

Pages