Father & Daughter

Submitted by प्रकाश काळेल on 25 August, 2009 - 05:42

IMG_0007.JPG

या ६ ऑगस्टला आमच्या घरी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशीर्वादाने कन्यारत्नाचे आगमन झाले.
'यावरून स्केच काढता येईल' या कलेक्शनमधे याचा मूळ फोटोग्राफ बरेच दिवस पडुन होता. जेंव्हा सौं नी पहिल्यांदा बातमी दिली तेंव्हा हे स्केच काढायला मुहुर्त लागला. आणि फेब्रुवारी मधे लग्नाच्या वाढदिवसाला चित्र भेट म्हणुन दिले.फोटोच्या शिर्षकाबद्दल माझा कयास पक्का होता, म्हणजे मी हेच शीर्षक मनात ठेवून काढले होते .पण तरीही ते प्रकाशित करण्यापुर्वी फायनल रिझल्ट कळणे महत्वाचे होते.
शीर्षक तसे साधेच आहे पण त्याची मूळ प्रेरणा ही ऑस्कर अवार्डेड शॉर्ट अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.
http://www.youtube.com/watch?v=BZ2An5BGgNs वेळ असल्यास अवश्य पहा.

स्केच मोठ्या आकारात

गुलमोहर: 

प्रकाश, सर्वप्रथम कन्यारत्नाबद्दल अभिनंदन... भाग्यवान आहात घरी कन्यारत्न आलंय....

स्केच अतिशय सुंदर आहे. फिल्म घरीच पाहता येईल, पण साधारण असाच शॉट 'द कंप्लिट मॅन' च्या जाहिरातीत पाहिला असे धुसरसे आठवतेय...

पक्या,
आठवलं Happy या चित्राबद्दल तु मला बोलला होतास एकदा फोनवर...
फार सुरेख आलंय. Happy
तुझ्या कन्यारत्नाला सुद्धा असंच हृदयाशी जपून ठेव.
नाहीतरी पोरी बापाकडेच जास्ती कलतात...

खूप खूप शुभेच्छा, तुझी कन्या तुला अजून चित्रं काढायला प्रेरणा देवो.. Happy

सुंदर चित्र. ज्या शॉर्टफिल्म वरुन शिर्षकाची प्रेरणा मिळाली ती देखील सुरेख आहे, तिचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
आणि गौरी घरी आली म्हणुन अभिनंदन Happy

प्रकाश, बाळ कसे आहे? ६ ऑ. हा विश्वशान्ती दिवस आहे. माझ्या लेकीचा वाढदिवस ७ ऑ. ( तो विश्व बड्बड दिवस आहे.) मी नवरात्राच्या सुट्टीत दिल्लीला येणार आहे तेन्वा जमेल तर भेटीनच. माझी नणंद खेलगाव मधे राहते. स्केच मस्तच आहे. तो बाबा खरं खूप गोड दिसतो आहे. हाताचे डीटेल मस्त जमलेत.

सुंदर !
त्या बिलगण्यातला आत्यंतिक विश्वास व मर्दानी हातांतलं मार्दव पुरेपूर उतरलंय !!
अभिनंदन व शुभेच्छा,
- भाऊ

कन्यारत्नाबद्दल अभिनंदन Happy
स्केच अप्रतिम. बाळाचं इवलेपण कळतंय. कपाळावरच्या रेषांमुळे वयही कळतंय - जेमतेम ८-१० दिवसांचा कोवळा जीव Happy

लेकीचे बाबा झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन!

चित्र केवळ अप्रतीम!!!!! हे स्केच फ्रेम करून ठेवा. मला खात्री आहे तुमची पिल्लू ह्याच्यावर जीवापाड प्रेम करणार आहे.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार ! Happy
मामी, ६ विश्वशांती आणि ७ विश्व बडबड दिवस काय ? आदल्या दिवशी शांती म्हणल्यावर दुसर्‍या दिवशी तेच होणार म्हणा ! तुमच्या कन्येला बिलेटेड शुभेच्छा! Happy दिल्लीला आलात तर जरूर भेटुया.

अतिशय सुंदर..अप्रतिम.
अभिनंदन.

Pages