Father & Daughter

Submitted by प्रकाश काळेल on 25 August, 2009 - 05:42

IMG_0007.JPG

या ६ ऑगस्टला आमच्या घरी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशीर्वादाने कन्यारत्नाचे आगमन झाले.
'यावरून स्केच काढता येईल' या कलेक्शनमधे याचा मूळ फोटोग्राफ बरेच दिवस पडुन होता. जेंव्हा सौं नी पहिल्यांदा बातमी दिली तेंव्हा हे स्केच काढायला मुहुर्त लागला. आणि फेब्रुवारी मधे लग्नाच्या वाढदिवसाला चित्र भेट म्हणुन दिले.फोटोच्या शिर्षकाबद्दल माझा कयास पक्का होता, म्हणजे मी हेच शीर्षक मनात ठेवून काढले होते .पण तरीही ते प्रकाशित करण्यापुर्वी फायनल रिझल्ट कळणे महत्वाचे होते.
शीर्षक तसे साधेच आहे पण त्याची मूळ प्रेरणा ही ऑस्कर अवार्डेड शॉर्ट अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.
http://www.youtube.com/watch?v=BZ2An5BGgNs वेळ असल्यास अवश्य पहा.

स्केच मोठ्या आकारात

गुलमोहर: 

झकास Happy सुन्दर प्रमाणबद्ध
बापाचा चेहरा दिसला अस्ता तर अधिक बर झाल अस्त, पण कोणत्याही कलेत, चेहरा अवघडच अस्तो हे मला स्वानुभवावरुन माहीत आहे
या चित्रावर एका फोटोचा झब्बू द्यायचा मोह आवरता आवरत नाहीये, अर्थात या क्षणी ते शक्यही नाहीये, पण जमेल तेव्हा एक फोटो नक्की टाकेन, शोधावा लागेल Happy

अरे आता पाहिले मी हे..
सर्वप्रथम कन्यारत्नाबद्दल हार्दिक अभिनंदन !!

चित्र तर अफलातूनच आहे..

सुंदर चित्र आहे.. बाळ सुरेख आलय त्यातले.. तो बापाचा चेहरा न दाखवणे मला अधिक आवडले.. फिल्म पाहिली नाही पण 'विथ आर्म्स वाइड ओपन' नावाचे क्रीड ह्या इंग्लिश (ब्रिटिश) रॉक बँडचे गाणे आठवले..

प्रकाश, अभिनंदन Happy अगदी परफेक्ट आलंय स्केच. बाळाची मूठ सोडून बाहेर आलेली करंगळी, कोवळ्या त्वचेच्या सुरकुत्या अगदी हुबेहुब.

प्रकाश..मानल..:) किती सुरेख..रेषांमधुन ती नजाकत साधलीये तु कोवळेपणाची...:)
मान गये!!!!!!

कलाकार होतास. आता बाप कलाकार झालाहेस. त्या नविनच झालेल्या बापाच्या सगळ्या भावना त्या हातात उतरल्या आहेत. मला मी बाप झाल्याचा क्षण परत एकदा आठ्वून दिला असे म्हणणार नाही कारण आठ्वण्याकरता आधी विसरावे लागते. आणि तो क्षण तर सगळ्यात सुंदर आणि अविस्मरणीय आहे माझ्याकरता. पण तुझ्या चित्राने परत त्या क्षणाची अनुभूती दिली.

बढती मिळाल्याबद्दल अभिनंदन ! आणि लेकीला शुभेच्छा - तुझ्याहूनही मोठी कलाकार होण्यासाठी.

सर्वांचे परत एकदा अभिनंदनाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मन:पुर्वक आभार! Happy
लिंबुभौ, मूळ फोटोग्राफमधेही पुर्ण चेहरा नव्हता बापाचा! चेहर्‍याविणा बापाच्या मनातले हळुवार भाव फक्त स्पर्शामधुन आणि बॉडी लँग्वेजमधुन दाखवायचा प्रयत्न आहे फोटोग्राफरचा.आणि मीही तेच भाव स्केचमधुन ठळक करायचा प्रयत्न केलाय.कितपत जमलाय ते माहीत नाही !
टण्या, ते क्रिडचे गाणेही अगदी खास आहे. सत्या, नांव अजुन ठेवायचं आहे.माधव, प्रतिसाद आवडया Happy

प्रकाश्,कन्यारत्नाबद्दल खूप खूप अभिनंदन . स्केच तर केवळ अप्रतिम आहे. बापाच्या दिसत नसलेल्या चेहर्यावरचे वात्सल्य, त्याने ज्या प्रकारे अगदी हळुवारपणे बाळाला धरले आहे त्यावरून आमच्या हृदयापर्यन्त भिडत आहे..
लेकीचे नाव काय ठेवलस??

प्रकाश, सर्वप्रथम अभिनंदन!
लेक झाल्याचा आनंद, मी सदैव तुझ्याबरोबर व तुझ्यासाठीच आहे हा बॉन्ड व्यक्त करणारे एक यथार्थ चित्र तू परफेक्ट रेखाटले आहेस. मानेचे खड्डे, मजबूत बाहू, समर्थ पण तितकीच अल्लाद पकड. इतक्या लहान बाळांना अंगही धरता येत नसल्याने - खालच्या पंजाच्या पकडीत घरंगळत असलेले बाळ. उजव्या पायाच्या टाचेच्या गोलाईचा तलमपणा व नाजूक करंगळी. डोक्याचा लिबलिबीतपणा व जरासे विरळ जावळ, बाळाच्या कपाळावरील आठ्या व डोळे यामुळे नक्की काही समजत नाही परंतु हा स्पर्श आश्वासक आहे हे भाव छान दाखवले आहेस. मला चित्र खूप आवडले. केवळ एक रेखाटन नसून तुझी गुंतवणूक दिसून येते. अप्रतिम.

अ प्र ति म !!!

जियो दोस्त !!

सगळ्यात पहिले कन्यारत्नाच्या आगमनाबद्दल तुम्हा दोघांचंही अभिनंदन Happy

अरे काय सही काढलं आहेस स्केच !! मान गये उस्ताद !!

अतिशय सुंदर!! बाप आणि मुलीच्या हळूवार नात्याचं मनोज्ञ रूप!!! रेषारेषांतून तो भाव ओसंडून वाहताना जाणवितो आहे. शब्दांची दया येते आहे भावा, चित्रातून जे उमटतं ते खरोखरच खूप अवर्णनीय आहे.

Pages