Father & Daughter

Submitted by प्रकाश काळेल on 25 August, 2009 - 05:42

IMG_0007.JPG

या ६ ऑगस्टला आमच्या घरी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशीर्वादाने कन्यारत्नाचे आगमन झाले.
'यावरून स्केच काढता येईल' या कलेक्शनमधे याचा मूळ फोटोग्राफ बरेच दिवस पडुन होता. जेंव्हा सौं नी पहिल्यांदा बातमी दिली तेंव्हा हे स्केच काढायला मुहुर्त लागला. आणि फेब्रुवारी मधे लग्नाच्या वाढदिवसाला चित्र भेट म्हणुन दिले.फोटोच्या शिर्षकाबद्दल माझा कयास पक्का होता, म्हणजे मी हेच शीर्षक मनात ठेवून काढले होते .पण तरीही ते प्रकाशित करण्यापुर्वी फायनल रिझल्ट कळणे महत्वाचे होते.
शीर्षक तसे साधेच आहे पण त्याची मूळ प्रेरणा ही ऑस्कर अवार्डेड शॉर्ट अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.
http://www.youtube.com/watch?v=BZ2An5BGgNs वेळ असल्यास अवश्य पहा.

स्केच मोठ्या आकारात

गुलमोहर: 

अभिनंदन ! भारी गोड असेल ना छोटी!
आणि चित्र फारच अप्रतिम ! छोट्या बाळाची नाजुक स्किन काय सुरेख जमलीय. फारच छान !
छोटीला खुप खुप आशिर्वाद ! तुम्हाला अन छोटीच्या आईला खुप खुप शुभेच्छा !

कित्ती मस्त चित्र काढलय. बाळाचे जावळ, अर्धवट उघडलेली मुठ, पायाची त्वचा... खुप सुरेख काढलय.

कन्यारत्न प्राप्ती बद्दल अभिनंदन.

अभिनंदन प्रकाश. खुपच सुंदर स्केच आहे. अशाच प्रकरचे एक बाईचे पोर्ट्रेट बर्‍याच जागी पहिले होते. पण हे स्केच प्रथमच पहातेय आणि हे खुप जास्त आवडलेय.
मुलीचे नाव कय ठेवले?

प्रकश,
अत्यंत गुणी कलाकार आहेस बाबा तू. हा तुझा आज कळालेला नवा पैलू खूपच ग्रेट आहे.
मुलीचा वडील झाल्याबद्दल अभिनंदन !! Happy {मीही दोन मुलींचा बाप आहे Happy Happy } खरे भाग्यवान असतात असे लोक.

प्रकाश, अभिनंदन!! अज्ञातरावांप्रमाणे मीही २ मुलींचा बाप आहे. तेव्हा वेलकम टू द वंडरफुल वर्ल्ड ऑफ फादर्स अँड डॉटर्स...
स्केचही फार आवडलं!!

अज्ञात आणि पुलस्ती तुमचे मन:पुर्वक आभार.

कन्येचे नांव 'इरा' ठेवतोय.(अजून बारसे नाही केलेलं पण आता रेकॊर्डला तर हेच नांव आहे!)

सर्वांचे पुनश्च: आभार ! Happy

Pages