सज्जन

दोष पाहता चिंतिता

Submitted by पुरंदरे शशांक on 25 May, 2019 - 02:46

दोष पाहता चिंतिता

दोष पाहता चिंतिता
दोषरुप दृष्टी झाली
अंतरात दोष येता
सृष्टी दोषमय झाली

देवा पांडुरंगा धाव
नको दावू दोष कदा
दृष्टी निर्मळ असूदे
मागणेचि तंव पदा

नको दोषांचे चिंतन
मनामाजी कदाकाळी
तुझे चरण वसूदे
चित्तात या सर्वकाळी

लाभो सज्जनांचा संग
याचलागी देवराया
नसे आस अन्य काही
लागतसे तंव पाया

विठ्ठल कृपा

Submitted by पुरंदरे शशांक on 10 October, 2017 - 09:09

विठ्ठल कृपा

विठ्ठलाची कृपा होता । मिटे संसाराची चिंता ।

अंतरात भाव शुद्ध । मुखी नाम स्वतःसिद्ध ।

नाठविते धन मान । हरीपायी नित्य लीन ।

संतसंगाचा हव्यास । समाधान अनायास ।

वाणी मृदू नवनीत । जाई अंतरे निववित ।

ऐसा भेटता सज्जन । जाऊ सहजी उद्धरून ।।

....................................
नवनीत = लोणी
सज्जन = सत् तत्वात राहणारा Happy

Subscribe to RSS - सज्जन