निर्मळ

दोष पाहता चिंतिता

Submitted by पुरंदरे शशांक on 25 May, 2019 - 02:46

दोष पाहता चिंतिता

दोष पाहता चिंतिता
दोषरुप दृष्टी झाली
अंतरात दोष येता
सृष्टी दोषमय झाली

देवा पांडुरंगा धाव
नको दावू दोष कदा
दृष्टी निर्मळ असूदे
मागणेचि तंव पदा

नको दोषांचे चिंतन
मनामाजी कदाकाळी
तुझे चरण वसूदे
चित्तात या सर्वकाळी

लाभो सज्जनांचा संग
याचलागी देवराया
नसे आस अन्य काही
लागतसे तंव पाया

Subscribe to RSS - निर्मळ