गौरी देशपांडे -अनया
आपण बहुतेक सगळे ठरावीक प्रकारचं, ठरावीक पठडीच आयुष्य जगतो. कुटुंबाची प्रेमळ आणि भक्कम चौकट, थोडा धाक- थोडे लाड असं लहानपण. शिक्षण - अर्थार्जन -लग्न. मग वंशवृद्धी. त्या आणि बाकी संसाराच्या जबाबदाऱ्या. किराणे - भाज्या- बँका - रुपये पैसे - कामवाल्या - तब्येती - आजारपणं, एक आणि दोन. पुढचं सगळं सारखंच. आपली मुलबाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे. मग फक्त भूमिकेत बदल होतात. बाकी सगळा त्याच तिकिटावर तोच खेळ. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे चालूच.
मराठी भाषेला आजवर अनेक गोड पहाटस्वप्ने पडून ती खरी झाली आहेत. मुकुंदराज, चक्रधरस्वामी ह्यांसारख्या धुरंधरांनी लावलेल्या ह्या वेलीवर सुरवातीला ज्ञानोबाचा मोगरा जो फुलला, तेव्हापासून ह्या भाषेचा फुलोरा कायम डवरलेलाच आहे. 'माझा मराठाचि बोलु कौतिकें | अमृतातेंहि पैजा जिंकें |' म्हणणार्या ज्ञानाची शरदाच्या चांदण्यासारखी शीतल प्रतिभागंगा आजवर अनेक वळणे आणि रूपे घेत वाहत आली आहे. पारिजात, बकुळ, गुलाब, जाई, कमळ, जास्वंद अशा अनेक फुलांबरोबरच ह्या वेलीवर गेल्या शतकामध्ये एक पिवळाधमक, सुवासिक, पण अजिबात नाजूक नसलेला विरक्त सोनचाफा फुलला, व आपल्या गंधाने आसमंत व्यापून दशांगुळे उरला.
सण, उत्सव याचे माणसाला जात्याच खूप आकर्षण असते. मराठी माणूस सुद्धा त्याला अपवाद नाही. तर या खेळात तुम्ही तुमच्याकडची खास मराठी सणांची आणि उत्सवांची प्रकाशचित्रे सादर करायची आहेत. हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.
आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.