भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.
आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.
एका वेळी एका संचात ५ म्हणी दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या प्रतिसादात त्या म्हणींचे रूपांतर लिहायचे आहे. जमल्यास सर्व पाचही म्हणींचे रुपांतर एका प्रतिसादात सुद्धा तुम्ही लिहू शकता.
तुमचे रुपांतर चटपटीत शब्दांत असायला हवे - अगदी म्हणींसारखे.
उदा. A penny saved is a penny earned
दमडी वाचली कमाई झाली.
२७ फेब्रुवारी संच १ -
१. The pot calling the kettle black.
२. Cut from the same cloth.
३. A chain is only as strong as its weakest link
४. A journey of a thousand miles begins with a single step.
५. A stitch in time saves nine.
२७ फेब्रुवारी संच २ -
६. A watched pot never boils.
७. Don’t bite the hand that feeds you.
८. Don’t count your chickens before they hatch.
९. Keep your friends close, and your enemies closer.
१०. The early bird gets the worm.
२७ फेब्रुवारी संच ३ -
११. The grass is always greener on the other side
१२. As thick as thieves
१३. A fool and his money are soon parted
१४. A friend in need is a friend indeed
१५. A golden key can open any door
१ The pot calling the kettle
१ The pot calling the kettle black.
कढई म्हणं तव्याला, किती रं तू काळा काळा
(या अर्थाची एक म्हण आधीच आहे. आपण हांसे लोकाला...)
५. A stitch in time saves nine
वेळेवर घातलेला एक टाका , वाचवी प्रसंग बाका
Cut from the same cloth.
Cut from the same cloth.
एकाच माळेचे मणी
२. Cut from the same cloth.
२. Cut from the same cloth.
'एकाच माळेचे मणी' ??
४. मैलांचा प्रवास पावलानीच
४. मैलांचा प्रवास पावलानीच सुरु होतो!
२. एकाच कापडाच्या पिशव्या
२. एकाच कापडाच्या पिशव्या
३. A chain is only as strong
३. A chain is only as strong as its weakest link
एकीचे बळ
४. A journey of a thousand
४. A journey of a thousand miles begins with a single step.
तुमचे पुढे टाकलेले एक पाऊल हे मैलाचा प्रवास ठरवते.
A journey of a thousand miles
A journey of a thousand miles begins with a single step.
जायचे हज्जार मैल? लेका टाक तर पहिले पाउल.
The pot calling the kettle
The pot calling the kettle black
मला म्हणतुस का रं काळ्या.
तुझं बूड बघ कि रं बाळ्या.
A chain is only as strong as
A chain is only as strong as its weakest link
सगळ्यात कमकुवत कडी
साखळीची मजबूती पारखतोय गडी.
A stitch in time saves nine.
A stitch in time saves nine.
योकच घाला टाकं
अन वेळीच टाचुन घ्या रं फाटकं.
५. वेळीच तुरपाई शहाणपणाची
५. A stitch in time saves nine.
वेळीच तुरपाई शहाणपणाची भरपाई
५. A stitch in time saves
५. A stitch in time saves nine
माझी आजी या अर्थाची मालवणी म्हण सांगायची
"येक चुकली येळा त दिवस जातत सोळा"
समर्पक आहे, टग्या.
समर्पक आहे, टग्या.
अमा, मस्त!
अमा, मानव मस्त!
मंडळी काही इंग्रजी म्हणींना पर्यायी म्हणी असतात. पण त्या न देता तुमच्या मनातले रुपांतर दिलेत तर जास्त रंगत येइल खेळात.
संयोजक, चांगला उपक्रम. खूप
संयोजक, चांगला उपक्रम. खूप विचार करूनच उत्तरे लिहावी लागतील !
१. The pot calling the kettle
१. The pot calling the kettle black.
तवा म्हणे कढईस,
बाई, किती करपलीस!
२. Cut from the same cloth.
एकाच ताग्याचे कटपीस!
३. A chain is only as strong as its weakest link
एकच हळवी जखम, आणि मामला खतम!
४. The journey of a thousand miles begins with a single step
एक पाऊल टाकशील, तर अनेक वाटा मिळतील
५. A stitch in time saves nine
वेळेत टाचा कापडं, नाहीतर पडाल उघडं.
३. A chain is only as strong
३. A chain is only as strong as its weakest link
साखळीचा बांधा पारखी कमजोर सांधा
अमा , भारीचं आहेत
अमा , भारीचं आहेत
४. A journey of a thousand
४. A journey of a thousand miles begins with a single step.
थेंबे थेंबे तळे साचे
>> मंडळी काही इंग्रजी
>> मंडळी काही इंग्रजी म्हणींना पर्यायी म्हणी असतात. पण त्या न देता तुमच्या मनातले रुपांतर दिलेत तर जास्त रंगत येइल खेळात.
माफ करा, हे आधी पहिलं नाही मी.
अमा, पूनम भारीच प्रतिसाद
अमा, पूनम भारीच प्रतिसाद
संयोजक, चांगला उपक्रम. खूप विचार करूनच उत्तरे लिहावी लागतील +१
३. A chain is only as strong
३. A chain is only as strong as its weakest link
नाजुक कडी साखळी तोडी
४. A journey of a thousand
४. A journey of a thousand miles begins with a single step
पहिले पाउल, विजयाची चाहुल
"विजयाची" ऐवजी "मैलांची" हा शब्द जस्त योग्य होईल का?
पहिले पाउल, मैलांची चाहुल
तवा म्हणे कढईस,
तवा म्हणे कढईस,
बाई, किती करपलीस!
नाजुक कडी साखळी तोडी
मस्त!
A stitch in time saves nine.
A stitch in time saves nine.
तलवारीला एकदा धार, जिंके युद्धे चार!
Cut from the same cloth.
Cut from the same cloth.
एकाच थाळीतील शितं
पूनम, मानव, अमा, मस्तं!
पूनम, मानव, अमा, मस्तं!
मस्त चालु आहे.
मस्त चालु आहे.
मस्त उपक्रम!मस्त चालु आहे. >>
मस्त उपक्रम!
मस्त चालु आहे. >> +१
Pages