'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग २
Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 12:19
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!