घाव
Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 September, 2017 - 02:02
घाव
सारेच घाव त्यांचे वर्मी बसून गेले
ओल्याच वेदनांना पुन्हा पिसून गेले
स्वप्नफुले अवेळी तोडून टाकलेली
ती बाग यौवनाची ते ऊखडून गेले
सोडून हात माझा सारे कसे पळाले
गर्दीत ते जसे केव्हाचे विरुन गेले
दु:खासही अशी माझ्या खोड का जडावी ?
डोळा कधीच नाही पाणी भरुन गेले
रानावनात आता कोणीच शेर नाही
कोल्हेच सर्व येथे राज्य करून गेले
दत्तात्रय साळुंके
विषय: