घाव
सारेच घाव त्यांचे वर्मी बसून गेले
ओल्याच वेदनांना पुन्हा पिसून गेले
स्वप्नफुले अवेळी तोडून टाकलेली
ती बाग यौवनाची ते ऊखडून गेले
सोडून हात माझा सारे कसे पळाले
गर्दीत ते जसे केव्हाचे विरुन गेले
दु:खासही अशी माझ्या खोड का जडावी ?
डोळा कधीच नाही पाणी भरुन गेले
रानावनात आता कोणीच शेर नाही
कोल्हेच सर्व येथे राज्य करून गेले
दत्तात्रय साळुंके
हृदयात माझ्या पूर्वीचेच घाव अनेक होते
नव्याने पुन्हा केले काही, त्यात एक नाव तुझेही होते
केले ज्यांनी घाव ते गुन्हेगारच होते
दु:ख ह्याचे त्यातले काही हात माझेच होते
नव्या चेहऱ्यांची मला आज ओळख होते
पूर्वी तेच चेहरे परिचयाचे होते
कुणास ठाऊक हे असेच का आणि कसे होते
घाव झाल्याविना उमगत नाही हाती त्यांच्याही सुरेच होते
वाटले औषध होऊन विरघळेल तुझी मिठी माझ्या हृदयात
पण औषध नाही तुझ्या मिठीतही जहरच होते
माझ्या हृदयाचे वागणेही बघ न किती विसंगत
ज्यांनी केले होते घाव, शेवटच्या श्वासातही पुन्हा त्यांचेच होते नाव
हृदयात माझ्या फक्त घाव घाव आणि घाव ...
-------------------