हृदयात माझ्या पूर्वीचेच घाव अनेक होते
नव्याने पुन्हा केले काही, त्यात एक नाव तुझेही होते
केले ज्यांनी घाव ते गुन्हेगारच होते
दु:ख ह्याचे त्यातले काही हात माझेच होते
नव्या चेहऱ्यांची मला आज ओळख होते
पूर्वी तेच चेहरे परिचयाचे होते
कुणास ठाऊक हे असेच का आणि कसे होते
घाव झाल्याविना उमगत नाही हाती त्यांच्याही सुरेच होते
वाटले औषध होऊन विरघळेल तुझी मिठी माझ्या हृदयात
पण औषध नाही तुझ्या मिठीतही जहरच होते
माझ्या हृदयाचे वागणेही बघ न किती विसंगत
ज्यांनी केले होते घाव, शेवटच्या श्वासातही पुन्हा त्यांचेच होते नाव
हृदयात माझ्या फक्त घाव घाव आणि घाव ...
-------------------
नमस्कार
मी अभिषेक कुलकर्णी, माझ्या बद्दल थोडस सांगतो,मी कविता करतो, मनापासून, मला कवितेतील
शास्त्र अजिबात कळत नाही. गझल कशाला म्हणायचे काव्य कशाला म्हणायचे ह्याची परिपक्वता मला नाही. परंतु मी हाडाने, मनाने खरा कवी आहे किमान माझ्यापुरता तरी.
मी माझे काही प्रयन्त आपल्या समोर नम्रपणे आणि काहीतरी शिकण्याच्या हेतूने सदर करीत आहे तरी माझे बालपण समजून घेऊन आपल्या सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभेल अशी आशा करतो.
धन्यवाद
अभिषेक कुलकर्णी.
८४५४०४६३१४
अभिषेक तुझे गझल च्या ह्या
अभिषेक तुझे गझल च्या ह्या ग्रुप मध्ये स्वागत आहे.
चांगला प्रयत्न आहे. बाकी गझल आणि त्याच्या शास्त्राबद्दल दिग्गजांचे मार्गदर्शन लाभेल अशी आशा करतो.